Thursday 7 May 2015

तंत्रास्नेही शिक्षणाची वाटचाल

                                      तंत्रास्नेही शिक्षणाची  वाटचाल
    तंत्रस्नेही शिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणारे शिक्षक गेल्या काही वर्षापासून विविध प्रयोग व संशोधन करताना दिसतात. ई-लर्निग, डिजिटल स्कूल, विविध इलेक्ट्रॉनिक साधनांच्या सहाय्याने मुलाना तंत्रज्ञांनाच्या आधारे अध्ययन अनुभव दिले जात आहेत.प्रत्येकजण स्वतंत्रपणे काम करत होता. या सर्वांना एकत्रीतपणे व्यासपीठ मिळण्यासाठी संतोष भोंबळे या शिक्षकाने Whatsapp वर तंत्रस्नेही शिक्षकांसाठी एक राज्यस्तरीय ग्रुप तयार केला. या ग्रुपला मा.नंदकुमार साहेब यांनी Tech Savvy Teacher असे नाव दिले. या ग्रुपच्या माध्यमातून स्वतंत्रपणे काम करणारे तंत्रस्नेही शिक्षक एकत्र आले व त्यांच्यात माहितीचे, तंत्रज्ञानाचे संप्रेषण घडू लागले.
         डिजिटल स्कूलचे जनक संदीप गुंड, निमखेडा ते वाशिंग्टन पर्यंत तंत्रभरारी घेणारे अनिल सोनुने,शैक्षणिक व्हिडीओ व ऑनलाईन टेस्ट बनवणारे बालाजी जाधव, ब्लॉगच्या माध्यमातून शैक्षणिक माहितीचा बोजा कमी करणारे राम सालगुडे z.p.guruji च्या माध्यमातून शिक्षकांना तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी ट्युटेरिअलद्वारे मार्गदर्शन करणारे सुनील आलुरकर या सर्वांचे मार्गदर्शन ग्रुपमधील सर्वांना होऊ लागले. प्रशांत कऱ्हाडे, सचिन कडलग, भाऊसाहेब चासकर,सोमनाथ वाळके,संजय पुळकूटे,संतोष दहीवळ यासारख्या अनेक शिक्षकांनी आपापल्या शैक्षणिक वेबसाईट व ब्लॉगच्या माध्यमातून मुलांसाठी ई-शिक्षणाचा खजिना खुला केला. काही तंत्रस्नेही शिक्षक शैक्षणिक व्हिडीओ,पी.पी.टी.,विविध अप्लिकेशन बनवून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करत होती.
         या पार्श्वभूमीवर प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मा.नंदकुमार साहेबांच्या संकल्पनेतून 18/04/2015 रोजी महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांची सहविचार सभा विद्यापरीषद पुणे येथे झाली. मा.पुरुषोत्तम भापकर साहेब,आयुक्त शिक्षण, मा.नामदेवराव जरग साहेब संचालक विद्यापरिषद यांनी या तंत्रस्नेही शिक्षकांचे काम समजून घेऊन कौतुक केले.
          महाराष्ट्रातील सात लाख शिक्षक तंत्रस्नेही करण्यासाठी,जगभरात महाराष्ट्राचं शिक्षण दर्जेदार करण्यासाठी डिजिटल स्कूलच्या माध्यमातून तंत्र भरारी घेण्यासाठी techsavvyteacher.in ही राज्यासाठी शैक्षणिक वेबसाईट सुनील आलुरकर यांनी तयार केली आहे.
         महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांचे प्रेरणास्थान आदरणीय नंदकुमारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षक मेहनत घेत आहेत. राज्यभरात तंत्रस्नेही शिक्षकांच्या कार्यशाळा होत आहेत. समाजाचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.यापुढे महाराष्ट्रातील ई-शिक्षणाची वाटचाल गतीमान होऊन सबंध महाराष्ट्रातील शाळा नक्कीच डिजिटल स्कूल होतील.


                              
                                                                         समाधान शिकेतोड
                                                                       जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री
                                                                      ता.भूम,जि.उस्मानाबाद

No comments:

Post a Comment