Tuesday, 11 August 2015

आजोबांची भेट

आज आजोबा परगावाहून नाती ला भेटण्यासाठी आले होते.ही मुलगी मामाकडे शिकते आमच्या शाळेत.

परिपाठाची वेळ होती. आजोबांना भेटण्यासाठी मुलगी जावू लागली.
नाती साठी आजोबांनी केळी वैगरे काहीतरी आणले होते.

नातीला पाहून आजोबांना गहीवरून आलं. मटकण खाली बसले अन् डोळ्यात अश्रू आले.

नकळत दुरून टिपलेला हा क्षण. ....

ही मुलगी यावर्षीच आमच्याकडे आली आहे. सुरूवातीला वाचनातील
गती कमी होती.
पण आता अभ्यास झपाट्याने सुधारलाय......