लेखकाविषयी


       समाधान शिकेतोड 



 समाधान शिकेतोड हे उपक्रमशील,चिंतनशील  अध्यापक आहेत.विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सातत्यानं ते प्रयोगशील असतात.त्यांना २०१५-२०१६ सालचा महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.ते मराठी विषयासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य अभ्यासमंडळाचे सदस्यही आहेत.महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सदस्यही आहेत.


विविध शैक्षणिक मासिके,वर्तमानपत्रे यामधून ते शैक्षणिक विषयावर सातत्यानं लेखन करत असतात.लहान मुलांसाठी कथा,कविता लिहितात.मराठवाडा साहित्य परिषदेचे ते आजीव सभासद असून विविध साहित्य संमेलनात ते सक्रीय सहभागी असतात.

सीमावर्ती भागातील मुलांना बोलीकडून प्रमाण भाषेकडे आणण्यासाठी त्यांनी बोलीभाषा-प्रमाणभाषा शब्दकोश तयार केला आहे.मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी,समृद्धीसाठी काम करत आहेत.वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.सध्या DIECPD उस्मानाबाद येथे TECHER EDUCATOR व Language Pedogogy Expert म्हणून काम पाहत आहेत.विविध राष्ट्रीय,राज्यस्तरीय चर्चासत्रे यामध्ये सातत्यानं सहभागी होत असतात.

                    










             
                     
                     

No comments:

Post a Comment