Tuesday, 6 October 2015

किशोर मासीक अन् मुलांची भाषासमृद्धी

किशोर मासीक अन् मुलांची भाषासमृद्धी

बालभारती तर्फे किशोर मासीक प्रकाशीत केले जाते.मुलांच्या भाषा समृद्धिसाठी किशोर मासीक खूपच उपयुक्त आहे. कथा, कविता, शब्दकोडी, सामान्य ज्ञान असा  मुलांसाठी वाचनाचा खजिनाच यात असतो. अवांतर वाचनाची मुलांना गोडी लागावी यासाठी प्रत्येकानं हे मासीक मुलांना द्यायला हवे.

मुले यासाठी लेखनही करत असतात. त्यांच्या
स्व-अभिव्यक्ती या क्षमतेचा  विकास यातुन घडत असतो.अनुभवलेखन,प्रसंगवर्णन, गोष्ट पुर्ण करणे यातुन मुलांची  सृजनशीलता फुलत असते.

या मासीकाचे प्रत्येक पालकांनी वर्गणीदार व्हायला हवे. जि.प.च्या शाळांना हे मासीक येते. पण केंद्रीय शाळेवर येते.ते थेट शाळाशाळांमध्ये यायला हवे. याबद्दलच बालभारती च्या वितरण विभागात चर्चा केली.

आमचे काही मित्र तर पाच वर्षांचे वर्गणीदार झाले. मी ही वर्गणीदार आहे. किशोर चे दिवाळी अंक तर खुपच छान असतात. जुने दिवाळी अंक ही वाचनीय आहे.