Sunday, 6 March 2016

मुलांना समजून घेताना

● छावणी भेट ●

उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी पाऊस खुपच कमी झालाय.दुष्काळामुळं गुरांसाठी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

आमच्या शाळेतील मुलांचे पालक ही जनावरांना छावणीवर वैरणकाडी करण्यासाठी छावणीवर राहतात. शाळेतील पोरंसोरं ही आईबापासोबत शाळा सुटल्यावर छावणीवर जातात.

या दुष्काळी परिस्थितीचा आमच्या मुलांच्या शाळेतील उपस्थितीवर काहीही परिणाम जाणवत नाही. हे एक बरं. .........

मला आमच्या वर्गातील अनिकेत म्हणाला
"सर छावणीवर वासरू बघायला चला"
  "लई मस्त वासरू झालय गाईला "
त्यानं हट्टचं धरला. चलाचं सर.......
  मग काय शाळा सुटल्यावर निघालाे आम्ही छावणीवर........

  रखरखत्या उन्हात आडोशाला आपआपली    जनावरं रांगेत बांधलेली. ......
कुणी ऊस मोजतय....कुणी शेण काढतयं...
  सर छावणीवर म्हणून पालकाचे नमस्कार घेत. ..त्याच्याशी गप्पा मारत अनिकेतच्या जनावरांकडे निघालाे होतो.
  "काय परवडत नाही सर "
  "दुधाचं भाव लई उतारल्यात बघा"
   "छावणी हाय म्हणून बरंय नाहीतर जनावरं विकावी लागली असती"

हाडोंग्री गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं.कसण्योग्य जमिन नाही म्हणून प्रत्येकाकडं किमान पाच सहा गाई हमखास असणारच. ....

अनिकेतच्या छावणीतील जनावरांनापाशी गेल्यावर त्याच्या वडीलांनी नमस्कार केला.
अनिकेत वासरूला प्रेमानं  कुरवाळत होता.
मी तिथं आल्याचं समाधान
वेगळचं होतं त्याला. .....

किती संवेदनशीलता व भूतदया या लेकरांमध्ये. ........
प्राणीमात्रावर प्रेम करा हा संदेश अनिकेतला आपसुकचं मिळाला. ...