Sunday, 5 June 2016

कार्यशाळा

● राज्य अभ्यास मंडळ कार्यशाळा●
   प्रगल्भ व्हा.....
            स्थळ - रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
                    भाईंदर जि.ठाणे
             दिनांक - 30 मे ते 1 जुन

  सर्व भाषा विषयाच्या राज्य अभ्यास मंडळ सदस्यांची संवाद कार्यशाळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर जि.ठाणे या निसर्गरम्य ठिकाणी संपन्न झाली.
             "प्रगल्भ व्हा . . "  या विषयाच्या अनुषंगाने कार्यशाळेत चर्चा झाली. मा.प्राची साठे मॅडम ( मा.शिक्षण मंत्री महोदय यांच्या विशेष कार्याधिकारी ) यांनी अभ्यास मंडळातील सदस्यांना खुप छान मार्गदर्शन केले.
📌 अभ्यास मंडळातील सदस्यांच्या समृद्धिसाठी हे मार्गदर्शन खुपच उपयुक्त ठरले. सर्वांना प्रेरणा व दिशा मिळाली.
📌 भाषिक कौशल्ये आणि भाषेचे साहित्यिक अंग या विषयावर अभ्यासपुर्ण सादरीकरण मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत,उर्दू या भाषा विषयातील प्रत्येक गटाने केले.
  साहित्याचा मुलांच्या भाषिक समृद्धिसाठी कसा उपयोग होतो.साहित्यातुन मुलांचा सामाजिक विकास कसा होतो.भाषिक कौशल्यांच्या विकसनासाठी साहित्य,साहित्याचे विविध प्रकार या अशा विषयावर चर्चा झाली.
📌 क्षमताक्षेत्रानुसार क्षमता विधानावर चर्चा केली. क्षमता विधाने व अध्यापनशास्त्र यातील संबंध मा.प्राची साठे मॅडम यांनी खुप छान समजून दिला.
📌 अभ्यास मंडळ सदस्यांनी गटागटात चर्चा केली. पाठ्यपुस्तकातील पाठ्यांशाच्या निवडीचे निकष काय असतील यावर चिंतन केले. चिंतनातून, मंथनातून प्रत्येक विषयामधील निघालेल्या निकषांना क्षमताविधानांना जोड देऊन साहित्य निवड कशी करावी यावर प्रत्येक गटाने सादरीकरण केले.
📌 दर्जेदार पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यासाठी सदस्यांनी आपआपल्या भागातील भाषाशिक्षणातील ज्ञानरचनावाद प्रयोगाचे अवलोकन करावे. भाषाशिक्षण समजून घ्यावे. असा मौलिक सल्ला मा.प्राची साठे मॅडम यांनी दिला.

📌 मा. प्राची साठे मॅडम यांनी maharastra board,  CBSE, ICSE या बोर्डातील विषयांचे व मूल्यमापनापद्धतीबाबत जे संशोधक केलेले होते. त्यावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. मा.शीतल बापट यांनीही याबाबत विवेचन केले.

📌 शेवटच्या दिवशी आदरणीय नंदकुमारसाहेब साहेबांनी ( प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ) सर्व अभ्यास मंडळ सदस्यांशी संवाद साधला. त्याच्यांशी चर्चा केली.
     साहेबांनी जीवनव्यवहारातील उदाहरणे देऊन जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले. सर्वांना मंत्रमुग्ध केले. अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती करण्यासाठी जे शैक्षणिक तत्वज्ञान हा मुळ आधारस्तंभ असतो ते साहेबांनी सांगीतले. साहेब एक ग्रेट फिलाॅसाॅफरच आहेत.
📌 सहावीच्या पाठ्यपुस्तकात इयत्ता सहावीच्या मुलीची कविता आल्यामुळे मराठी सदस्यांचे साहेबांनी कौतुक व अभिनंदन केले.
  📌 नांदेडे साहेबांनी आपल्या ओघवत्या शैलीत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

  या कार्यशाळेसाठी बालभारती, विद्यापरीषद व बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळा खुपच छान झाली.

                                        शब्दांकन
                                    समाधान शिकेतोड