Monday 13 April 2015

मुलांची मैत्री समजून घेताना....

    मुलांची मैत्री समजून घेताना.....

इ.4 थी.च्या वर्गात द्वितीय सत्राच्या इंग्रजी विषयाची तोंडी परीक्षा घेत होतो.मी एक मुलांना प्रश्न विचारला होता.
What is your friend's name?
मुलं फक्त मुलांचीच व मुली मुलींचीच नावे सांगत होती.
माझ्या ही बाब लक्षात आली.
मुलींना विचारल,‘ तुम्हाला मित्र नाहीत का?'
( मुली आश्चर्यान हसल्या....)
मुलांना विचारलं,‘ तुम्हाला मित्र नाहीत का?‘
( मुलही संकोच करत हसत होती)
मी मुलांना सांगू लागलो...........
त्यांच ऐकू लागलो.................
मित्र.....मैत्रीबद्दल...........
संकटात उपयोगी पडणारा,मदत करणारा किंवा मदत करणारी मित्र किंवा मैत्रिण असू शकते.शाळेत तुम्ही सर्वजण किती एकमेकांना मदत करता.
कुणाला पेन, पेन्सील नसेल तर देता.खेळताना एकमेकांची काळजी घेता.सतत तुम्ही एकमेकांना समजून घेत असतात.असं कोण समजून घेतो तर मित्र किंवा मैत्रिणच ना?
ऋषिकेश म्हणतो.........
  ‘ आम्हाला मित्रमैत्रिनींचा अर्थच माहीत नव्हता.....‘
  मयुरी म्हणते,........
" सर तुम्हाला मित्र आहेत का?"
       "हो...खुप आहेत“
" सर तुम्हाला मैत्रिणी आहेत का?“
     "हो....आहेत"  
सरांना पण मित्रमैत्रिणी आहेत.हे समजल्यावर मुलांच्या मनातील कुतूहल संपल.त्यांना सांगीतल मी पण तुमचा मित्रच आहे.
मी तुम्हाला मार्गदर्शन,मदत करतो.तुम्हाला समजून घेतो...आहे ना मग मित्र?
   " हो..सर..हो...सर.."
मुलांनो तुमची आईसुद्धा तुमची मैत्रिण असते.( मुलांना आश्चर्य वाटत) तुमचे वडील,आजोबा सुद्धा मित्र असू शकतात.
मुलं आता समजू लागली...मैत्रीबद्दल....
मुलांच्या मनातील संकोचाची जळमट दूर करून त्यांची मैत्री समजून घ्यावी लागेल....क्षणाक्षणाला....

No comments:

Post a Comment