Friday 7 August 2015

अभ्यासक्रम समिती उदबोधन कार्यशाळा

●अभ्यासक्रम समिती कार्यशाळा● 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने अभ्यासक्रम समिती उदबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा दिनांक 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या कालावधीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर जि.ठाणे या निसर्गरम्य ठिकाणी संपन्न झाली.

राज्यातील विविध जिल्ह्यातून 200 पेक्षा जास्त तज्ञ,जाणकार, व्यासंगी, प्रयोगशील शिक्षक, विषयाची आवड असणारे या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

या तीन दिवसात NCF, SCF,RTE 2009,CCE, NEP 2015 यावर चर्चा करण्यात आली. मा.प्राची  साठे  (विशेष कार्यकारी अधिकारी शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य ) यांनी PPT च्या साह्याने विविध शैक्षणिक संकल्पनावर चर्चा केली.

दुसऱ्या दिवशी विषयानुसार गट करून गटकार्य दिले . एका छोटा पाठ तयार करून त्यावर ज्ञानरचनावादी स्वाध्याय तयार केले.
मा.नंदकुमार साहेब प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी मार्गदर्शन केले. सर्वबरोबर संवाद साधला. सुर्य, पृथ्वी यांचे फिरणे, माणसाने माणूसकी जपली पाहिजे,शिक्षणात भन्नाट कल्पना आल्या पाहिजेत.विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळायला हवी.असे विचार मांडले.
 
                     तिसऱ्या दिवशी मा.विनोदजी तावडे साहेबांचे आगमन झाले अन् सगळीकडे चैतन्य पसरले.साहेब सर्वामध्ये सहज मिसळून गेले. अभ्यासक्रम युगानुकूल असावा. विद्यार्थ्यांच्या भावनिक गुणवत्ता विकसीत करणारा, कौशल्यांचा विकास व्हावा असा असावा असे सांगितले. अनेक उदाहरणे देत देत त्यांनी शिक्षण बद्दल विचार मांडले.
मुक्तपणे सर्वांशी संवाद साधला . प्रश्नांची उत्तरे दिली. मस्त सर्वांसोबत फोटो काढले.

मंत्रीमहोद्ययांनी सर्वांना टिचर,ख-या शिक्षणाच्या शोधात इत्यादी पुस्तके भेट दिली . ही पुस्तकांची भेट अविस्मरणीय अनुभव आहे.

दुपारच्या सत्रात मा.भापकर साहेब आयुक्त शिक्षण यांनी शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र प्रगतशील करू असे सांगितले. अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी मा.गोविंद नांदेडे शिक्षण संचालक विद्यापरीषद, मा.नामदेवराव जरग शिक्षण संचालक, मा.गंगाधर म्हमाणे शिक्षण  संचालक, मा.च.रा.बोरकर शिक्षक संचालक
उपस्थित होते.

याठिकाणी निवासाची व भोजनाची व्यवस्था
उत्तम होती.ही कार्यशाळा अतिशय उत्तमप्रकारे झाली.

No comments:

Post a Comment