Wednesday 18 November 2015

आम्ही कविता लिहतो

आम्ही कविता लिहतो
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
आमच्या जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद या शाळेत परिपाठात विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांबाहेरील किंवा स्वलिखीत कविता सादर करायची असा उपक्रम सुरू केला होता.

आज दिव्य मराठी दैनिकात आमच्या शाळेतील इयत्ता चौथीच्या  विद्यार्थ्यांची कविता आली.
राबवलेल्या उपक्रमाचे समाधान वाटले.

•••••••••••••••••••••••••••••••••••
उपक्रमाबद्दल थोडेसे
••••••••••••••••••••••••••••••••••

📌 इयत्ता तिसरी च्या पाठ्यपुस्तकात कविता तयार करण्याचा उपक्रम दिला आहे. परंतु सुरूवातीला  मुलांना कविता करायला जमत नव्हते.
📌 मुलांना वर्तमानपत्रातील, मासीकातील,इतर पुस्तकातील कविता लिहून आणायला सांगितले व त्यांचे परिपाठात वाचन घेऊ लागलो.
📌 सुरूवातीला इयत्ता तिसरी मधील वैष्णवी भोसले ही परिपाठात कविता सादर करू लागली.
📌 याची इतर विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळाली व इयत्ता दुसरी,तिसरी व चौथीच्या वर्गातील विद्यार्थी पण कविता सादर करू लागले.
📌 पुढे अनुभवातून,निरीक्षणातुन कविता लिहू लागले.
📌 काही विद्यार्थी स्वतः लिहलेली कविता परिपाठात वाचून दाखवू लागले.
📌 छान कविता सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन बक्षीस दिला.

लवकरच शाळेत बालकवीसंमेलन घेत आहोत.

उपक्रमाची यशस्वीता
●●●●●●●●●●●●●●●●●●●●
📌 मुलांच्या सृजनशील विचाराला चालना मिळाली.
📌  मुलांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली.
📌  स्व-अभिव्यक्ती क्षमतेचा विकास यातुन झाला.
📌  स्वतःच्या नवनिर्मितीचा मुलांना आनंद  मिळू लागला.
📌 मुले वर्तमानपत्रातील बालकविता वाचू लागली.

भाषा समृद्धिसाठी हा उपक्रम नक्कीच उपयोगी आहे.

                       समाधान शिकेतोड
       जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम
          जि.उस्मानाबाद

No comments:

Post a Comment