Friday 4 December 2015

ज्ञानरचनावाद कार्यप्रेरणा कार्यशाळा

ज्ञानरचनावाद कार्यप्रेरणा कार्यशाळा
----------------------------------------------------------
                         स्थळ- डायट उस्मानाबाद.
                          दिनांक - 3 डिसेंबर 2015

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बीट चे विस्तार अधिकारी व प्रत्येक बीट मधील भाषा व गणित विषयातील तज्ज्ञ उपक्रमशील शिक्षक यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

📌 उस्मानाबाद जिल्ह्याला शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत मानाचं स्थान प्राप्त करण्याचा निर्धार करण्यात आला.
📌 मा.दयानंद जटनुरे (जेष्ठ अधिव्याख्याता)
सरांनी जिल्ह्यातील उपक्रमशील,तंत्रस्नेही शिक्षकांचा व प्रयोगशील अधिका-यांचा  आदरपूर्वक उल्लेख केला.
📌 मा.जटनुरे सरांनी ज्ञानरचनावाद या विषयावर सर्वांशी संवाद साधला. जीवनव्यवहारातील उदाहरणे देऊन ज्ञानरचनावाद समजून सांगीतला.
📌 ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन करताना आंतरक्रिया कशी घडते यावर सर्वांनी चर्चा केली. प्रत्येकाने मुद्दे सांगितले.
📌 मा.प्राचार्य डायट मा.शेख सर यांनीही ज्ञानरचनावादावर छान मार्गदर्शन केले.
📌 भाषा व गणित विषयाचे गट करण्यात आले.
📌 गटात अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्यासाठी द्यावयाचे अध्ययन अनुभव याविषयी चर्चा केली.
📌 भाषा विषयातील गटात वाचन, लेखन, आकलन या क्षमताक्षेत्राच्या विकासासाठी वाचन, लेखन, आकलनाच्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली.
📌 आदरणीय जटनुरे सरांनी भाषा विषयाचे खुप अभ्यासपुर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
📌 समाधान शिकेतोड यांनी भाषा गटातील शिक्षकांशी संवाद साधला व उपक्रमांवर चर्चा केली.
📌 उपक्रमशील शिक्षक विनोद कांबळे यांनी गणित गटातील चर्चेचे छान सादरीकरण केले.सुधिर वाघमारे यांनी भाषा विषयाचे सादरीकरण केले.
📌 आपल्या बीट मध्ये राबवावयाच्या कृतीकार्यक्रमाची रूपरेषा मा.माने सर विस्तार अधिकारी यांनी सांगितली.
📌 पुढे बीटस्तरावर अशी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद जिल्हा अप्रगत विद्यार्थी विहीन जिल्हा करण्याचा सर्वांनी संकल्प केला.

                                      शब्दांकन
                              समाधान शिकेतोड

No comments:

Post a Comment