Friday 18 March 2016

शिक्षक समृद्धिसाठी. ......

⭕ शिक्षक समृध्द करताना......⭕

गटशिक्षणाधिकारी कार्यालय,पंचायत समिती लातूर च्या वतीने प्रगत शै. महा. या कार्यक्रमातंर्गत ' शिक्षक समृध्द करताना' अनेक वेगवेगळे उपक्रम/ कार्यक्रम/ कार्यशाळा  घेण्यात आल्या.
       त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 17 मार्च 2016 रोजी शिक्षणशास्त्राचे गाढे अभ्यासक किशोर दरक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ही कार्यशाळा सत्रात घेण्यात आली.
  

⭕सत्र पहिले: फिनलंडची शिक्षण पध्दती: एक अभ्यास

किशोर दरक यांनी फिनलंड देशातील शाळा आणि शिक्षण पद्धतीचे वेगळेपण,भारतीय शिक्षणव्यवस्था आणि फिनिश शिक्षणव्यवस्था यांच्यातील मुलभूत भेद-साम्ये, बालकांच्या अधिकारांचा,आणि फिनिश व्यवस्थेकडून आपल्याला कोणकोणत्या  गोष्टी स्विकारता येतील आणि आपली शिक्षण व्यवस्था आणखी समृद्ध करता येईल याबाबत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

 📌फिनलंड हा आकाराने अत्यंत छोटा उत्तर ध्रुवाजवळील शीत कटिबंधीय देश आहे, पण त्याने जगाचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले ते २००० साली झालेल्या आंतरराष्ट्रीय PISA या परीक्षेत जगात पहिला येण्यामुळे.

📌PISA हि जागतिक पातळीवरील अत्यंत मनाची आणि तितकीच अवघड परीक्षा आहे.

📌फिनलंडमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुरुवात वयाच्या ७व्या वर्षापासून होते.

📌फिनलंडमध्ये ७ ते १६ वर्षांपर्यंतचे प्राथमिक शिक्षण बालकांना मोफत दिले जाते.

📌प्री-स्कूल एज्युकेशन मात्र मोफत नाही.

📌दहावीपर्यंतचे सर्व शिक्षण देशात सर्वत्र एकाच बोर्डचे असते, त्यानंतर मात्र व्यावसायिक शिक्षण किंवा जनरल अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा चॉईस विद्यार्थ्यांना असतो.

📌देशातील प्रत्येक बालकाला (मग ते अल्पसंख्यांक असो, अल्पभाषिक असो वा बाहेरच्या देशातून फिनलंडमध्ये आश्रयाला आलेले निर्वासित मुल असो) शिक्षण , उत्तम आरोग्य आणि गरम पौष्टिक अन्न मिळाले पाहिजे याबाबत फिनिश सरकार दक्ष असते. बालकांच्या या मुलभूत अधिकारांच्या बजावणीबाबत फिनिश सरकार फार गंभीर आहे.

📌शाळांमध्ये इयत्तावर वर्ग नसून विषयांनुसार वर्ग आहेत. विषय शिक्षक आपापल्या  वर्गावर थांबतात. मुले मात्र आपल्याला हव्या त्या विषयाच्या वर्गात जाऊन शिकतात.

📌प्रत्येक ४५ मिनिटांच्या तासिकेनंतर विद्यार्थ्याना विश्रांती व पुढील विषयाच्या पूर्वतयारीसाठी मोकळीका असते.

📌प्रत्येक वर्गात भिंतींना असलेल्या कपाटांत पुरेसे प्रयोगाचे साहित्य असते. ते हाताशी असल्याने मुलांनी स्वत: प्रयोग करण्याची शक्यता खूप वाढते.

📌फिनलंडमध्ये १ ते ६ चे शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर ५ वर्षांचा कोर्स करावा लागतो. ७ व्या वर्गापासूनच्या शिक्षकाना त्या त्या विशयाची मास्टर्स डिग्री आणि एक वर्षांचा पेडगॉजी कोर्स करणे आवश्यक असते. उच्च दर्जाचे इनपुट्स त्यांना दिलेले असल्यामुळे सेवांतर्गत प्रशिक्षणांची फारशी आवश्यकता नसते.

📌समाजाप्रती शिक्षकांमध्ये उत्तरादायीत्वाची भावना निर्माण केली जाते. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो.

📌फिनलंडमध्ये अभ्यासक्रम लागू करण्यापूर्वी तो दोन वर्षे आधी जनतेला चर्चेसाठी खुला करण्यात येतो. लोकांची मतं विचारात  घेऊन त्यात योग्य ते बदल केले जातात.

⭕सत्र दुसरे: गुणवत्तापूर्ण शिक्षणात शिक्षकाची भूमिका:

👉शिक्षकाने कोणाचीही काॅपी करू नये.

👉अध्यापन पद्धती ठरवताना काळानुरूप बदल करा.

👉शिक्षकाने स्वत:ला आपल्या शिकवण्याच्या बाबतीत स्वायत्त ठेवावे. त्यासाठी स्वत:मधे अनेक क्षमता आधी निर्माण करण्याची गरज आहे.

👉मुलांनाही स्वायत्तता द्यावी.कारण मोकळ्या वातावरणात मुले शिकण्याची शक्यता वाढते.

👉गुणवत्तेची व्याख्या शब्दांत बांधणे अवघड;पण विद्यार्थी विचारप्रवृत्त होणे आणि अभिव्यक्त होणे महत्वाचे.

👉शिक्षकाने स्वत:चे क्षमता संवर्धन करावे.

👉शिक्षकांनी सतत आत्ममग्न रहाण्याएवजी आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करावे

👉 सर्वानीच स्व सक्षमीकरण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवं आहे.

आज कार्यशाळेत किशोर दरक यांनी अतिशय खुमासदारपणे उपस्थितांशी संवाद साधला. त्यांच्या अभ्यासपूर्ण, चिंतनशील आणि तितक्याच सहज-सुलभ संवादाने सर्वांची मने जिंकून घेतली.शिक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक व अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.
शिक्षक समृध्द होण्याच्या प्रवासातील आजची कार्यशाळा म्हणजे खरोखर एक 'माईल स्टोन' ठरली.

                            ⭕ तृप्ती अंधारे
                                  गशिअ लातूर

No comments:

Post a Comment