Sunday 6 March 2016

भाषाशिक्षण

● काव्यलेखन कार्यशाळा ●

           दिनांक - 20 फेब्रुवारी 2016

जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद या शाळेतील मुलांच्या अभिव्यक्ति क्षमतेचा विकास व्हावा,कविता लेखनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती.

गेल्या अनेक दिवसापासून परिपाठात मुले पाठ्यपुस्तकांबाहेरील कवितांचे वाचन करून दाखवत आहेत. काही मुलांच्या कविता वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या आहेत.यामुळे इतर मुलांनाही प्रेरणा मिळून तेही कविता लेखनाचा छान प्रयत्न करत आहेत.

मुलांना यमक कसे जुळवावे.कवितेचा विषय कसा निवडावा? कविता लिहताना कशी लिहावी? याबद्दल सांगितले.
काही विद्यार्थ्यांनी मासीकातील कवितांचे वाचन केले. मुलांना कोणत्याही आवडत्या विषयावर कविता करायला सांगितले. मुलांनी अतिशय सुंदर कविता लिहल्या.त्यांचे वाचन केले. मुलांना खुपच आवडली ही कार्यशाळा !!

मुलांच्या प्रतिभेला पंख फुटावेत यासाठीच ही धडपड सुरू आहे. मुले किती अफलातून कल्पना करतात,किती छान सुचतं त्यांना !  त्यांच्या मनातील विचार, भावना, संवेदना कागदावर कवितेच्या रूपात उमटतात.

                          समाधान शिकेतोड
                  जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम

No comments:

Post a Comment