Sunday 13 November 2016

पर्यावरण संमेलन

🌴पर्यावरण संमेलन🌴
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

  स्थळ - राळेगणसिद्धी
  दिनांक - 11 व 12 नोव्हेंबर 2016

राळेगणसिद्धी येथे 11 व 12 नोव्हेंबर 2016 रोजी पर्यावरण संमेलन संपन्न झाले. या संमेलनात महाराष्ट्रील प्रयोगशील शिक्षक, पर्यावरण प्रेमी, पर्यावरणाचे अभ्यासक सहभागी झाले होते. या संमेलनाचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष मा.पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मा.वाय.बी.सोनटक्के, सहसंचालक महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, मा.दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक पुणे,मा.आबासाहेब मोरे, अध्यक्ष निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, मा.बी.एन.शिंदे, जेष्ठ हवामान तज्ञ व इतर मान्यवर उपस्थित होते.

    ■पहिला दिवस■

🌳 मा.वाय.बी.सोनटक्के यांचे *जलप्रदूषण व नियंत्रण*या विषयावर व्याख्यान झाले.खुप अभ्यासपूर्ण व सांख्यिकी आकडेवारीसह पर्यावरणाच्या होणाऱ्या -हासाबद्दल माहिती दिली.
🌳 पर्यावरण कायद्याची संपूर्ण माहिती दिली. प्रदूषणाचे तोटे सांगून त्यावर काय काय उपाययोजना करता येतील याबद्दल चर्चा केली.

🌳 शिक्षकांनी विचारलेल्या पर्यावरणासंबंधी प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.

🎄 यानंतर जालन्यातील *रोटी फाऊंडेशन* बद्दल फाऊंडेशन चालवणा-यांनी माहिती सांगितली. हे फाऊंडेशन गरिब लोकांपर्यंत कार्यक्रमातील शिल्लक अन्न पोहचते. एका एका घासासाठी गरिब लोक अन्नाची वाट बघत असतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या ताटातील अन्न वाया जाऊ देवू नये. असा मौलिक सल्ला दिला.

🌳 दुपारच्या सत्रात जेष्ठ हवामान तज्ञ मा.प्रा.बी.एन.शिदें यांचे *पर्जन्यमान वाढवता येईल*या विषयावर व्याख्यान झाले.
📌 सरांनी पर्यावरणाच्या अभ्यासासाठी जगभर भ्रमंती केली. इस्त्राइलमधील शेतीपद्धतीची सुंदर माहिती दिली.
📌 *शाश्वत शेतीतून पर्जन्याचे नियमन*या विषयावर उदाहरणे देऊन  मार्गदर्शन केले.
📌 महाराष्ट्रात जास्तीत जास्त *वृक्षपिके* घ्यावीत याबद्दल भौगोलिक कारणे देऊन वृक्षपिकांचे महत्त्व सांगीतले.
📌 जगातील समुद्रकाठची शहरे पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन, संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
            ■दुसरा दिवस■

📌सकाळी पर्यावरणीय कवितांचे कविसंमेलन झाले.

       🌲 *शिवारफेरी* 🌲
गटागटाने शिवारफेरी काढण्यात आली. माथा ते पायथा या पाणलोट विकासाच्या संकल्पनेतुन गावातील पाणी गावातच फिरवलं आहे. त्यामुळे माळरानावर हिरवळ फुलली आहे. गावातील जलसंधारणाची नाविन्यपूर्ण कामे पहायला मिळाली.
यामुळेच चारशे - पाचशे मि.मी.पाऊस पडणारं गाव आज समृद्ध व स्वावलंबी झालं आहे.

शिवारफेरीत गावातील व्यक्ति गाईड बनून माहिती देत होता. हिरव्यागार वनराईने नटलेल्या राळेगणसिद्धीची शिवारफेरी म्हणजे अविस्मरणीय अनुभव होता. आदरणीय आण्णांनी भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिवर्तन करून गावाचा कायापालट करून टाकला आहे.

राळेगणसिद्धी ऑडियो विज्युवल मिडीया सेंटर पाहताना आदरणीय आण्णांनी केलेले काम पाहताना आम्ही स्वतःला विसरून गेलो होतो.
आदरणीय आण्णांचे *माझं गाव माझ तीर्थ* हे पुस्तक त्या ठिकाणी मिळाले.हे पुस्तक खुप जणांनी विकत घेतले.

पाणलोट क्षेत्र विकास, पाण्याचे योग्य नियोजन, सामूहिक विवाह, आरोग्य शिक्षण, धान्य बॅक,महिलांचा सहभाग, व्यसनाचा त्याग या अशा अनेक ग्रामविकासाशी निगडीत उपक्रमामुळेच राळेगणसिद्धी *ग्रामविकासाची पंढरी* झाले आहे.

●आदरणीय आण्णांशी संवाद●

शिवारफेरीनंतर राज्याच्या कानाकोप-यातुन आलेल्या शिक्षकांशी संवाद साधला. आदरणीय आण्णांचे विचार कानात प्राण आणून प्रत्येकजण ऐकत होता.

🌿 यानंतर डॉ. माधव गाडगीळ यांचे *जैवविविधता दस्तावेज* या विषयावर व्याख्यान झाले. चर्चा झाली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक समाधान शिकेतोड व उमेश खोसे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या संमेलनात खुप काही शिकायला मिळाले. पर्यावरण संरक्षणाच्या जाणीवजागृतीसाठी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.उपस्थितांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

                               समाधान शिकेतोड जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि. उस्मानाबाद

No comments:

Post a Comment