Monday 27 February 2017

मराठी भाषा गौरव दिन

⚡ मराठी भाषा गौरव दिन ⚡

जेष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचा  27  फेब्रुवारी हा जन्मदिवस *मराठी भाषा गौरव दिन* म्हणून साजरा करण्यात येतो.

मराठी भाषेचा विकास,अभिवृद्धि व संवर्धन व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या वर्षीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त *संगणकावरील आणि महाजालावरील मराठी* या विषयाला प्राधान्य देण्यात आलेले आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राबवावयाचे विविध उपक्रम

📌  *विकीपीडिया वर लेखन*- विकीपीडिया हे एक विविध भाषांमध्ये उपलब्ध असणारे लोकप्रिय संकेतस्थळ आहे. यावर प्रत्येकजणांने  मराठी देवनागरी लिपितील किमान एक परिच्छेदाचे लेखन करावयाचे आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर, भाषा अभ्यासक, भाषा प्रेमी नागरीक, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक सर्वजण विकीपीडियावर 27 फेब्रुवारी रोजी लेखन करणार आहेत. *मी ही लेखन करणार आहे.*
📌  प्राथमिक, माध्यमिक शाळेत काव्यसंमेलन, कथाकथन, साहित्यिकांच्या मुलाखती  अभिवाचन इत्यादी उपक्रम घेता येतील.
📌  *लेखक आपल्या भेटीला* हा उपक्रम राबवता येईल.
📌 मराठी भाषा संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांचा गौरव करणे.
📌 मराठी सुलेखन, सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धा व संबंधित कार्यशाळा आयोजित करणे.
📌 शाळांमध्ये किशोर, लोकराज्य मासीकांचे वाचन करणे.
📌 विविध शब्दकोश, विश्वकोश यांचा परिचय करून देणे.
📌 बोलीभाषेवरील कार्यक्रम
📌 विद्यार्थी साहित्य संमेलन
📌  मराठी कविता, मराठी संबंधित घोषवाक्ये यांचे भित्तीचित्र प्रदर्शन
  
मराठी भाषेच्या विकासासाठी, संवर्धनासाठी व अभिवृद्धिसाठी अशा  विविध उपक्रमांचे आयोजन करता येईल.

*शासन परिपत्रक, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन दि. 21 जानेवारी  2017 यामध्ये  उपक्रम सुची देण्यात आलेली आहे. हे उपक्रम राबविण्यात यावेत.*

  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आमच्या जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता. भूम जि. उस्मानाबाद या शाळेतील विद्यार्थ्यांनी मा. अध्यक्ष, साहित्य अकादमी नवी दिल्ली यांना पत्रे लिहिली होती.

समाधान शिकेतोड
मराठी भाषा विभाग
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण  व्यावसायिक विकास संस्था(DIECPD) उस्मानाबाद.

No comments:

Post a Comment