Monday 30 April 2018

     स्वच्छ विद्यालय पुरस्कार कार्यशाळा पुणे

     स्वच्छ विद्यालय पुरस्कार कार्यशाळा पुणे
         दिनांक- 27 व 28 एप्रिल 2018
        स्थळ- महाराष्ट्र विद्याप्राधिकरण पुणे.
--------------------------------------------------

भारत सरकारने 2 ऑक्टोबर 2014 पासून संपुर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. देशातील सर्व शाळांसाठी सन 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.त्याच धर्तीवर महाराष्ट्राने स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.सदर पुरस्कारासाठी राज्य पातळीवर निवड झालेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांची व राज्य निर्धारकांची कार्यशाळा महाराष्ट्र विद्याप्राधिकरण पुणे,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विद्याप्राधिकरण पुणे येथे संपन्न झाली.

पुरस्कार निवड
राष्ट्रीय पातळीवर-100 शाळा
राज्य पातळीवर- 40 शाळा
जिल्हा पातळीवर- 48 शाळा

    *मार्गदर्शक*
1) मा.डॉ.सुनिल मगर
संचालक,महाराष्ट्र विद्याप्राधिकरण पुणे.
2) मा.डाॅ.नेहा बेलसरे
संचालक, मीपा औरंगाबाद.
3) मा.वैशाली कांबळे
उपसंचालक,मीपा औरंगाबाद
4)मा.असिफ शेख
कार्यक्रम अधिकारी MPSP मुंबई.
5) मा.संदिप तेंडुलकर
सल्लागार युनिसेफ
6)मा.आनंद घोडके
कार्यक्रम अधिकारी युनिसेफ
7) मा.महादेव माळी

   पहिल्या दिवशी सर्व मान्यवरांनी मुख्याध्यापक व निर्धारकांना सविस्तर मार्गदर्शन केले. दुस-या दिवशी शिरूर तालुक्यातील उपक्रमशील,स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाळा भेट झाली.

1) जि.प.प्रा.शाळा शिवनगर(डोंगरगण)ता.शिरूर जि.पुणे.
2) आंतरराष्ट्रीय शाळा जि.प.प्रा.शाळा वाबळेवाडी ता.शिरूर

    □ *जि.प.प्रा.शाळा शिवनगर* □
*स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय  पुरस्कार प्राप्त शाळा*

*खुप कमी कालावधीत  शाळेची गगनभरारी.......*

📌उपक्रमशील शिक्षक श्री.बाळासाहेब घोडे यांनी शाळेची यशोगाथा सांगितली.सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.
📌शाळा पहिली ते पाचवी खुपच सुंदर,टुमदार शाळा दिसत होती.स्वच्छ परिसर,टापटिपणा दिसत होता.शाळा ज्ञानरचनावादी,डिजीटल होती.मुलांच्या शिकण्यासाठी अध्ययन समृद्ध वातावरण शाळेत होते.
📌झांडाच्या फांद्यांना लटकवेली गोष्टीची पुस्तके लक्ष वेधून घेत होती.प्रत्येक वर्गात बालवाचनालय होते.
📌चिमण्यांची खास काळजी घेतली जात होती.त्याच्यांसाठी छान घरटी तयार केली होती.मूल्यशिक्षणाचे संस्कार मुले जगण्यातून अनुभवत होते.मुलांना पिण्यासाठी R.O.चे शुद्ध पाणी होते.
शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षांचे उत्तम सहकार्य होते.
📌दर गुरूवारी शाळेत खास गप्पांचा तास मुलांसाठी असतो.मुले प्रश्न विचारतात,शिक्षक उत्तरे देतात.मुले कशी भन्नाट प्रश्न विचारतात याची काही उदाहरणे सरांनी सांगितली.
मुले स्वतः नळाची दुरूस्ती करतात.विज्ञानाचे प्रयोग करतात.

*आंतरराष्ट्रीय शाळा जि.प.प्रा.शाळा वाबळेवाडी ता.शिरूर जि.पुणे.*
📌 शांतीनिकेतनच्या संकल्पनेवर शिक्षण प्रक्रीया
  विषयानुसार वर्गखोल्या.....
📌स्वतंत्र ग्रंथालय, संगीत कक्ष,स्वतंत्र अद्ययावत प्रयोगशाळा,काचेच्या वर्गखोल्या,शाळेची संपूर्ण वीजनिर्मिती सोलारवर,लाॅनवर खेळाची मैदाने.
📌बॅक ऑफ न्यूयॉर्क च्या मदतीने काचेच्या वर्गखोल्यांची निर्मिती.लोकसहभागातून शाळेची समृद्धी....
📌शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पिसा परीक्षेच्या तयारीबद्दल बोलत होते.
📌32 वरून 350 पट
📌पुढील वर्षी अॅडमिशन वेटिंगवर..शाळेत मुलांचा ओढा वाढला.लवकरच 1000 पटाची शाळा होणार.
📌 पालक दररोज देतात शाळेसाठी वेळ
📌अध्ययन समृद्ध शालेय वातावरण
📌 गावातील यात्रा रद्द करून गावकरी देतात शाळेला लोकसहभाग......
📌 मुले प्रयोगशाळेत स्वतः प्रयोग करतात.
📌 शाळेत वाय-फाय...शेवटच्या तासीकेत मुले वाय-फाय चा उपयोग करून प्रश्नांची उत्तरे शोधतात.

उस्मानाबाद जिल्ह्यातील राज्य स्तरावर निवड झालेल्या शाळेचे मुख्याध्यापक  श्री.नागनाथ गटकळ हे कार्यशाळेत सहभागी होते.

या शाळा भेटीत खुप काही शिकायला मिळाले.
मा.असिफ सर व त्यांच्या टिमने कार्यशाळेसाठी प्रचंड मेहनत घेतली.

समाधान शिकेतोड
राज्य निर्धारक,स्वच्छ विद्यालय पुरस्कार

No comments:

Post a Comment