Sunday 24 April 2016

●प्रवास समृद्धिचा●

●प्रवास समृद्धिचा●

गेल्या तीन दिवसात पहिल्याच जवळपास  1500 किमी. प्रवास करण्याचा योग आला.

भूम - अमरावती -पूणे - भूम

📌 अमरावती येथे Case Study च्या कार्यशाळेत सहभागी झालो अन् राज्यातील प्रयोगशील अधिकारी व शिक्षकांसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली .
📌 महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रेरणास्थान आदरणीय नंदकुमारसाहेब साहेब प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
हे स्वतः दिवसभर कार्यशाळेसाठी उपस्थितीत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली Case Study वर विचारमंथन झाले.
साहेबांचे प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले.
📌 खुप प्रयत्न करूनही वर्गातील एक - दोन विद्यार्थी प्रगत होत नाहीत. अशा मुलांची case study करून मुलांना समजून घेऊन प्रगत कसे करता येईल. याबद्दल चर्चा झाली.
📌  अशा मुलांना समजून घेण्यासाठी एक फाॅर्म तयार करण्यात आला.
नक्कीच यातुन शिक्षकांना मदत होईल. असे विद्यार्थी प्रगत होतील.

   📖  20 तारखेला SCERT pune येथे इयत्ता सहावी पुनर्रचित अभ्यासक्रम ,पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक याचे मराठी विषयाचे प्रशिक्षण संपन्न झाले.

प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम  2012 नुसार इयत्ता सहावी पुनर्रचित अभ्यासक्रम पाठयक्रम
भाषा विषयाची क्षेत्रे,क्षमता

इयत्ता सहावीच्या नविन पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये
गद्य व पद्य
मुल्यमापन व स्वाध्याय

या विषयावर प्रशिक्षण झाले.
प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व शिक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
त्यांना नविन पाठ्यपुस्तक व प्रशिक्षण खुप आवडले.

No comments:

Post a Comment