शिक्षणातील सुसंवाद..शिक्षण संवाद शिक्षणातील सृजनतेचा,नवतेचा वेध घेणारा शैक्षणिक ब्लॉग...

Monday, 29 January 2018

पुस्तक भिसी

पुस्तक भिसी
-----------------------------------------------------
महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक व सध्या विषय सहायक,प्रादेशिक विद्याप्राधिकरण मुंबई प्रिय मित्र वेच्या गावीत यांनी शिक्षकांच्या समृद्धीसाठी पुस्तक भिसी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात आगळावेगळा पायंडा पाडला.
शिक्षक नवनविन शैक्षणिक पुस्तके वाचू लागले.पुस्तकावर चिंतन,चर्चासत्रे होऊ लागली. यातून स्वतःला समृद्ध करत मुलांच्या हितासाठी धडपड करण्याची उर्मी मिळाली.टिचर सारख्या पुस्तकाची प्रेरणा घेऊन अनेकजण दुर्गम भागात रचनात्मक कार्य करू लागले.
हा उपक्रम नुकताच पार पडलेल्या शिक्षणाच्या वारीतही पाहायला मिळाला.वेच्याच्या रचनात्मक कामाचे भरभरून कौतुक झाले.इतर काही जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रेरणा घेऊन अशी पुस्तक भिसी सुरू केली.मी माझ्या जिल्ह्यातील शिक्षकांसाठी अशी पुस्तक भिसी लवकरच सुरू करतोय.

                   - समाधान शिकेतोड