Saturday 25 April 2015

ज्ञानरचनावादी शिक्षण

ज्ञानरचनावादी शिक्षण

23 एप्रील रोजी भूमच्या शिक्षण विभागाची टीम सातारा येथील प्रयोगशील शिक्षणविस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांच्या बीटमधील शाळा पाहण्यासाठी गेली होती.शाळेतील प्रयोग पाहत असताना आम्ही सर्वजण ज्ञानरचनावादाचा अनुभव घेत होतो.आमच्या सोबतच पुरंदरच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार व कळमनुरीचे गटशिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारी हेही होते.इथ खुप काही शिकता आल.मा.तृप्ती अंधारे गटशिक्षणाधिकारी भूम यांनी या अभ्यासदौ-याचं छान नियोजन केलेल होत.आम्ही तिन ग्रुप करून वेगवेगळ्या शाळा पाहिल्या नंतर पं.स.सातारा येथे एकत्र बसून आमचे अनुभव शेअर केले.
★प्रतिभा भराडे यांनी सांगीतल की ज्ञानरचनावाद म्हणजे मुलांना शिकवायचं काहीही नाही पण शिकण्यासाठी वातावरण तयार करायच.
★ पहिलीतुन दुसरीत जाणारी मुल 50 छोटी छोटी पुस्तकं वाचतात.
★ मुलांच भाषाशिक्षण रचनावादामुळ नैसर्गीक पद्धतीन घडतं.
★मुल छोटशी नाटुकली,संवाद अभिनय करतात. दुसरीची मुल गोष्टी रचतात.शब्दसंग्रह करतात.
★ मुलं स्वत: वाचायला शिकतात.त्याच्या अनुभवविश्वातील चित्र पाहून वाचन करायला शिकतात.
★ अभिव्यक्तीसाठी शब्दांचा डोंगर हा उपक्रम खासच वाटला
★हार्डबोर्ड व व्हेलवेट पेपरपासून भिंतीलगत केलेले अभिव्यक्ती फलक अफलातून होते.
★आयुष्यात व्यवहारात जगता आल पाहिजे.त्यासाठी मुलं गणित व्यवहारातून शिकतात.
★ वर्गात स्वत: मुलांनी बनवलेली स्वयंअध्यन कार्ड होती.खुप सारं साहित्य व्यवस्थित ठेवलेल होत.मुल ते हाताळत होती.
★नागेश वाईकर या हिंगोलीहून आलेल्या मित्रानं मुलाना विज्ञानखेळणी दिली.त्यातील विज्ञानतत्व मुलांनी शोधल
★प्रतिभा ताईनी सांगीतलं की मुलांच्या मेंदुला आव्हानं लागतात.त्यासाठी मुलांना खुप सारं साहित्य द्यावी लागतात.
★1)दिवस नवा,विचार नवा,  नविन शब्द रोजच हवा.
2) मालिका शास्त्रज्ञांची
3) विज्ञान रांगोळी हे उपक्रम खुपच आवडले.
★ मसाला माती व अमृत पाणी तयार करण्याची रीत मुलांनी सांगीतली.त्यामुळच शाळेच्या परसबागा मानानं डोलताना दिसल्या.
★साठेवाडीची शाळा तर बिनघंटीची व बिनवेळापत्रकाची शाळा....मुलं शिकत होती नैसर्गीक पद्धतीनं....बालस्नेही वातावरणात....अगदी पहिलीच्या मुलांनी सुंदर नाटीका सादर केली. मला त्या दोन शिक्षीकेची धडपड पाहून सिल्व्हीया वाॅर्नर या स्विझर्लड मधील प्रयोगशील शिक्षीकेची आठवण आली.अगदी तसचं काम यांनी उभ केल होत....रचनावादी पद्धतीन....
★ प्रतिभाताई रचनावादाबद्दल खूप सांगत होत्या.तसा रचनावादी शिक्षण आम्ही समजून घेत होतो.
माझा वर्ग रचनावादी करण्यासाठी साहित्याची जमवाजमव सुरू केलीय.   
या अभ्यासदौ-यासाठी आमच्या भूमच्या टीम मध्ये प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी मा.तृप्ती अंधारे, शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख सहभागी झालेले होते.

No comments:

Post a Comment