Showing posts with label ग्रेट भेट. Show all posts
Showing posts with label ग्रेट भेट. Show all posts

Wednesday, 23 September 2026

गप्पा, कविता आणि दासू वैद्य सर

काल दासू वैद्य सरांना भेटायचा योग आला! सरांच्या कविता वाचायला जेवढी मजा येते, तेवढीच मजा त्यांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारताना आली. खूप गप्पा झाल्या, साहित्यावर बोलणं झालं आणि एक ऊर्जा मिळाली. ही भेट नेहमीच स्पेशल राहील! सरांचे खूप आभार! 

 सरांच्या गप्पांसोबतच एक भारी सरप्राईज मिळालं! सरांनी मला एक शाईचा पेन भेट दिला. सरांच्या लेखणीचा हा वारसा असाच पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. ही भेट माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणात राहणारी आहे! सरांचे खूप खूप आभार!

#DasuVaidya #NewGift #InkPenLove #ग्रेट_भेट 
 #गप्पाआणिकविता  
#गप्पा #मराठीभावना #साहित्यप्रेमी

Sunday, 13 November 2022

चंदनाचे हात

प्रिय फारूक सर यांना कु.प्राची काळे हीच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आज पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. फारूक सरांनी आपल्या मनोगतातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. खूपच अभ्यासपूर्ण मांडणी केली.बालसाहित्य, पालकत्व, मुलांची अभिव्यक्ती यावर भाष्य केले.

बर्‍याच दिवसांनी मित्राची भेट झाली होती.बालसाहित्यावर चर्चा केली. फारूकनं मला प्रसिद्ध साहित्यिक,व्याख्याते श्री. यशवंत पाटणे यांचं चंदनाचे हात हे पुस्तक भेट दिलं.

Monday, 7 November 2022

सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांची भेट

आदरणीय नीलेश निमकर सर यांच्या शिकता शिकविता या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा ३ नोव्हेंबर रोजी पुण्यात संपन्न झाला. मला या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक, प्रसिद्ध चरित्रलेखिका  वीणा गवाणकर, प्रसिद्ध सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांना ऐकता आले.

अतुल कुलकर्णी हे आपल्याला सिनेअभिनेते म्हणून परिचित आहेतच.त्याचबरोबर त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद आहे. क्वेस्ट संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करत आहेत.त्यांनाही प्रत्यक्ष ऐकता आलं. त्यांचे शिक्षणविषयक विचार समजून घेता आहे.त्यांनी निमकर सरांच्या पुस्तकावर खूपच छान भाष्य केले.