Showing posts with label #बालसाहित्य #जादुई_जंगल #पुरस्कार #childrenLiterature #बालकादंबरी #room_to_read #storytelling #storyweaver. Show all posts
Showing posts with label #बालसाहित्य #जादुई_जंगल #पुरस्कार #childrenLiterature #बालकादंबरी #room_to_read #storytelling #storyweaver. Show all posts

Sunday, 26 February 2023

जादुई जंगल बालकांदबरीला बालसाहित्य पुरस्कार मिळाला

जादुई जंगल या बालकादंबरीला मानाचा प्रसाद बन राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून आनंद होत आहे. 

माझ्या बालसाहित्य लेखनाची प्रेरणा ही  मुलेच आहेत.मुलांसोबत काम करताना साहित्याची बीजं सापडतात. मुलांचं जगणं, भावविश्व समजून घेऊन लिहीत गेलो. नवनवीन साहित्यकृतींची निर्मिती होत गेली. या साहित्यकृती मुलांना आवडत आहेत. याचा मनस्वी आनंद होत आहे.

जादुई जंगल बालकांदबरीला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे.हा पुरस्कार मुलांसाठी नवनवीन लिहण्यासाठी प्रेरणा देत राहील. 

आमचे दीपस्तंभ, मार्गदर्शक, प्रसिद्ध साहित्यिक आदरणीय डाॅ.सुरेश सावंत सर, आदरणीय डाॅ.अच्युत बन सर यांचे मनापासून खूप खूप आभार.