Showing posts with label समृद्ध होताना. Show all posts
Showing posts with label समृद्ध होताना. Show all posts

Wednesday, 21 December 2022

अधिकारी शिक्षकांना घडवतात,शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात

स्तराधारीत वाचन साहित्य निवड समितीतील सदस्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या ठिकाणी आजपासून कार्यशाळा सुरू झाली आहे. या निमित्ताने आज SCERT मध्ये आलो होतो. आज सकाळी परिविक्षाधिन उपशिक्षणाधिकारी यांच्या वर्गात परिपाठाच्या वेळेस त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.  एक शिक्षक म्हणून माझा शैक्षणिक प्रवास उलगडून दाखवला. 

माझ्या घडणीमध्ये पर्यवेक्षिय अधिकाऱ्यांचा किती मोठा वाटा आहे. याबद्दल सांगीतले. नौकरीच्या सुरूवातीच्या काळात मला लाभलेले शिक्षण विस्तार अधिकारी श्री.व्यंकटेश चौधरी यांच्या सहवासात मी घडत गेलो.त्यानंतरही अनेक अधिकाऱ्यांनी समृद्ध केले.याबद्दल सांगीतले.

 नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागात केलेलं काम, डायट, बालभारती, माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड, शाळेत राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याबद्दल सांगीतले. सर्वांशी संवाद साधून खूप आनंद वाटला. सिपीडी विभागाचे विभागप्रमुख मा.अरूण जाधव याप्रसंगी उपस्थित होते.