Showing posts with label विमानभरारी. Show all posts
Showing posts with label विमानभरारी. Show all posts

Tuesday, 16 May 2023

विज्ञान शैक्षणिक सहल

आमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची विज्ञान शैक्षणिक सहल जिल्हा परिषद प्रांगणातून निघाली. या विज्ञान सहलीला परिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. मा.जिल्हाधिकारी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सहलीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी खूप आनंदी होते. त्यांना सहलीची उत्सुकता लागलेली होती. विमानाने प्रवास करून अंतरिक्ष केंद्र श्रीहरी कोट्टा येथे उपग्रह प्रक्षेपणाचा अनुभव विद्यार्थी घेतील. केरळमधील थुंबा येथे स्पेस रिसर्च सेंटरही पाहतील. 

मा.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.शिक्षणाधिकारी व इतर अधिकारी विद्यार्थ्यांसोबत सहलीमध्ये सहभागी आहेत. या विज्ञान सहलीमधून विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे पालकही निरोप देण्यासाठी आले होते. त्यांनाही खूप आनंद झाला होता.

आमच्या शाळेतील भक्ती दर्लिंग बेलदार ही विद्यार्थीची या विज्ञान सहलीत निवड झालेली आहे. तिला निरोप देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आलेले होते. भक्तीला खूप खूप शुभेच्छा. भक्तीला ही संधी मिळणे ही आमच्या शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.

#माझी_शाळा_माझा_अभिमान 
#विज्ञान_सहल
#विमान_भरारी

Wednesday, 22 March 2023

विमानभरारी श्रीहरीकोटा

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. संशोधनवृत्तीचा विकास व्हावा. विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी. शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी. याहेतूने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र,श्रीहरिकोटा येथे विमानाने विज्ञान सहल आयोजित केली जाणार आहे. 

या विज्ञान सहलीसाठी जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी या शाळेतील प्रतिभावंत, प्रज्ञावंत,सर्जनशील विद्यार्थ्यींनी कु. भक्ती दर्लिंग बेलदार हीची निवड  झालेली आहे. तिचे खूप खूप अभिनंदन. भक्ती अतिशय हुशार,नम्र,मनमिळाऊ विद्यार्थ्यींनी आहे. अवांतर वाचनाची आवड आहे. ग्रंथालयातील पुस्तके आवडीनं वाचते. पुस्तक परिचय लिहते. वक्तृत्व उत्तम आहे.अतिशय गुणी मुलगी.

वडीलांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. घरची परिस्थिती बेताचीच. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी, मेहनतीतून हे यश मिळविलेले आहे. तिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेतही यश संपादन केलेले आहे.

तिचं विमानवारीचं स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, खूप आनंद वाटत आहे.

शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन.