Tuesday, 17 May 2022
कृतीशील शिक्षक संमेलन
Monday, 20 June 2016
शिक्षक संमेलन लातूर
*आनंदाने शिकण्याच्या दिशेने*
शिक्षकांच्या समृद्धिसाठी, प्रगल्भीकरणासाठी खुपच छान शिक्षक संमेलन लातूर या ठिकाणी देखण्या रिसाॅर्ट मध्ये निसर्गरम्य ठिकाणी संपन्न झाले.
हा अविस्मरणीय अनुभव घेता आला. मलाही समृद्ध होता आले याचं मनोमन समाधान वाटलं.
लातूरच्या प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी
मा.तृप्ती अंधारे यांच्या कल्पकतेतुन व करके देखो व्हाॅटस्अॅप ग्रुपच्या परिश्रमामुळे संमेलन खुपच छान झाले.
सर्वच तज्ञ मार्गदर्शकांनी उत्तम सादरीकरण केले व संवाद साधला. मीही मा. विठ्ठलराव भुसारे गटशिक्षणाधिकारी पूर्णा यांच्या सोबत एका
चर्चासत्राचे संचलन केले.
मा. अविनाश धर्माधिकारी सर ( माजी सनदी अधिकारी ) यांचे उद्घाटनपर मार्गदर्शन व मा.गोविंद नांदेडे शिक्षण संचालक विद्यापरीषद पुणे. यांचे समारोपाचे भाषण अविस्मरणीय ठरले.
Sunday, 5 June 2016
शिक्षक संमेलन
*आनंदाने शिकण्याच्या दिशेने*
('करके देखो'व्हाॅटस् अप ग्रुपव्दारा आयोजित शिक्षक संमेलन)
'प्रत्येक मूल शिकावं'ही तळमळ घेऊन काम करणार्या शिक्षकांना एकत्र करण्यासाठी...... करत असलेल्या कामांना दिशा देण्यासाठी.....प्रयोगशील शिक्षकांनी एकत्र येऊन विचारांच्या देवाण-घेवाणीबरोबरच एकमेकांना प्रेरणा व उर्जा देण्यासाठी...करत असलेल्या कामात येत असलेल्या अडचणींवर विचार विनिमय व्हावा,शिक्षणक्षेत्रातील नवनवे विचारप्रवाह समजून घेणे आणि एकूणच शिकणे आणि शिकवणे अधिक समृध्द,आनंददायी-उर्जस्वल होण्यासाठी हे दोन दिवसीय संमेलन आम्ही घेत आहोत.
*स्थळ*:-हाॅटेल कार्निव्हल,बोरवटी,ता.जि.लातूर
*कालावधी*:-दि.10 व 11 जून 2016
*स्वागत मूल्य*-750 रूपये
*संपर्क*-
श्री.पन्हाळेसाहेब-942247256
श्री.भामरे आर.एम.-9405645046
श्री.शेळके बी.आर.-955252316 श्रीमती.डोंगरेएम.एम.-9890465090
*परिषदेची वैशिष्ट्ये*
1)शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन
2)मुक्त चर्चा
3)ज्ञानरचनावादी अध्यापनासाठी विशेष विषय सत्र
4)शाॅर्ट फिल्म व त्यावर चर्चा
5)सुसज्ज बैठक व्यवस्था व भोजनव्यवस्था
*सहभागी मार्गदर्शक*
1)मा.अविनाश धर्माधिकारी सर,
2)मा.डाॅ.रमेश.पानसे सर,
3)मा.सुजाता पाटील मॅडम,
4)मा.प्रियदर्शिनी हिंगे मॅडम,
5)मा.शिवाजी आंबुलगेकर सर,
6)मा.अजय महाजन सर,
7)मा.रणजितसिंह डिसले सर
8)मा.ज्योती परिहार
9) मा.विठ्ठल भुसारे
10) मा.सोमनाथ वाळके
11) मा.समाधान शिकेतोड
*संमेलनातील विषय*
1)ज्ञानरचनावाद समजून घेताना,
2)शिक्षकांनी लिहिते व्हावे म्हणून,
3)बहुभाषिक मुलांचे भाषाशिक्षण,
4)रचनावादी विज्ञान अध्यापन,
5)समानतेसाठी शिक्षण,
6)बालचित्रकलेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन
7)अध्यापनात तंत्रज्ञान
संमेलनात सहभागी होण्यास इच्छुक व्यक्तींनी खालील लिंकवर जाऊन फाॅर्म भरावा व श्री.शेळके बी.आर.(लातूर)-9552523161
यांच्यांशी संपर्क साधून स्वागतमूल्य भरावे.
http://goo.gl/forms/WGoV8nxNMguGm2Km2
*कर के देखो* Whats App ग्रुपचे सर्व शिलेदार*
Thursday, 21 May 2015
★ ATF शिक्षण संमेलन 2015★
★ ATF शिक्षण संमेलन 2015★
अॅक्टीव टिचर फोरम चे शिक्षण संमेलन बायफ पुणे येथे 18 व 19 मे रोजी संपन्न झाले.सकारात्मक उर्जा घेऊन काम करणारे प्रयोगशील शिक्षक,शिक्षणतज्ञ, प्रयोगशील अधिकारी संमेलनासाठी आले होते. ATF चे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी छान प्रास्ताविक केले.
शिक्षणतज्ञ के.के.कृष्णकुमार यांनी "गुणवत्तापुर्ण शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात शिक्षकाची भूमीका" या विषयावर विचार मांडले.सर्वानी त्यांच्यासोबत मनमोकळेपणानं चर्चा केली.भारतातील विविध शैक्षणिक प्रवाहाबद्दल सखोल विवेचन केलं.नंतर दृष्टीकोनात बदल हा परिसंवाद रंगला.
प्रतिभा भराडे,मंजिरी निंबकर,मोहन भोईर,प्रल्हाद काठोले,नामदेव माळी,मोहन देस यांनी परिसंवादात भाग घेतला.नामदेव माळी सरांनी विनोदी शैलीनं व्यवस्थेतील उणीवा सांगीतल्या. व्यवस्थेतील सर्वानीच मुलांशी संवाद साधायला हवा.पदाचा हँगओव्हर होऊ नये. जी तारे,बेटं काम करतात त्यांना व्यवस्थेतेन बळ द्याव.
प्रयोगशील शिक्षकांनी लावलेल्या पोस्टरचं वेगळच आकर्षण होतं. शाळेत राबवलेले प्रयोग,उपक्रम यावर पाहायला मिळत होते.राम,सोमनाथ,गुणेश,अनिल,फारूख,अगस्ती हे सर्वजण हाॅलमधील व्यवस्थेची काळजी घेत होते.
इंग्रजी व सेमी इंग्रजी यावर परिसंवाद झाला.वर्षा सहस्त्रबुद्धे,श्रीधर लोणी,जे.के.पाटील,फारूख काझी,कृतीका बुरघाटे, के.के.कृष्णकुमार यांनी सविस्तर चर्चा केली.मुलांचं शिक्षण प्राथमिक भाषेतुन व्हावं हाच मुख्य चर्चेचा सुर होता.शुभदा चौकर यांनी संचलन केले.
अशातच प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग आदरणीय नंदकुमार साहेब आले.वातावरण प्रफुल्लीत झालं.साहेबांनी सर्वांसोबत छान चर्चा केली.
अचानक मस्तानी आल्याचा आनंद सर्वाना झाला.मस्तानीचा आस्वाद घेतल्यानंतर साहेबांनी पुन्हा सर्वाशी चर्चा केली.
शेवटी गाणी गप्पांचा छान कार्यक्रम रंगला......
संमेलनाच्या दुस-या दिवशी तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर यावर परसंवाद रंगला.विवेक सांवत,अनिल सोनुने,नीलेश निमकर,राम सालगुडे यांनी यात सहभाग घेतला.सांवत सरांनी खुप छान मार्गदर्शन केले.सर्वानी खुप छान चर्चा केली.सोमनाथ सरांनी संचलन केले.
यानंतर बालकांचे आणि व्यवस्थेचे मूल्यमापन या परिसंवादात वैशाली गेडाम,विवेक माॅटेरो यांनी सहभाग घेतला.वैशाली गेडाम यांनी त्या करत असलेल्या प्रयोगाविषयी सांगीतले.राहुल गवारे यांनी यांच संचलन केलं.
संमेलनातला हा परिसंवाद खुपच झकास रंगला.शिक्षक म्हणून आपल्या समृद्धीसाठी या विषयावरप्रमोद धायगुडे,गुणेश डोईफोडे,सुरेश सुतार,कल्पना बनसोड,शशीकला पाटील,मोहन भोईर,सुवर्णा देशपांडे,योगेश थोरात या शिक्षकांनी विचार मांडले. प्रमोद धायगुडे,कल्पना बनसोड यांनी तर संपूर्ण सभागृहाला जिंकल.खुपच छान समृद्धीचा प्रवास कथन केला.प्रकाश आरोटे यांनी संचलन केले.
गीता महाशब्दे यांनी पुढील गुणवत्ता कार्यक्रमाबद्दल माहीती दिली.त्यावर चर्चा झाली.
नंतर भाऊ,समिक्षा,हिरालाल सर यांनी ठराव मांडले.सर्व ठराव संमत झाले.
नामदेव माळी यांनी
धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है........
हे गीत सर्वांसोबत गाऊन संमेलनाची
सांगता झाली.
माझं हे पहिलच संमेलन...मला खुप काही शिकायला मिळाल.संवाद साधता आला.या चळवळीतला कार्यकर्ता असल्याचा आनंद मनोमन होत होता.
भाऊचं व त्यांच्या सहका-याच्या कष्टातून उत्कृष्ट नियोजन झाल होत.