Monday, 7 December 2015

ज्ञानरचनावाद कार्यप्रेरणा कार्यशाळा

ज्ञानरचनावाद कार्यप्रेरणा कार्यशाळा
----------------------------------------------------------
                स्थळ - चांदणी विद्यालय चांदणी
                 दिनांक - 7 डिसेंबर 2015

प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परांडा तालुक्यातील पिंपळवाडी बीट मधील शिक्षकांची बीटस्तरावर कार्यशाळा चांदणी विद्यालय चांदणी ता.परांडा जि.उस्मानाबाद येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेसाठी मा.घनश्याम पौळ अधिव्याख्याता डायट उस्मानाबाद,
मा.जाधव साहेब गटशिक्षणाधिकारी परांडा, मा.फुलारी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पिंपळवाडी, उपक्रमशील शिक्षक समाधान शिकेतोड, दत्ता गुंजाळ व पिंपळवाडी बीट मधील भाषा व गणित विषयातील तज्ज्ञ वाघमारे सर व चौरे सर उपस्थित होते.

📌  मा. घनश्याम पौळ अधिव्याख्याता डायट यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची पार्श्वभुमी, स्वरूप व या कार्यक्रमातील डायटची भुमिका स्पष्ट केली.
शिक्षकांना प्रेरणादायी उदबोधनपर मार्गदर्शन केले.
📌 शिक्षण विस्तार अधिकारी मा.फुलारी सरांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा
शासननिर्णय समजावून सांगितला. पिंपळवाडी बीट अप्रगत विद्यार्थी विहीन करण्यासाठी  शिक्षकांना सकारात्मक उर्जा  दिली.
📌  मा.जाधव साहेब गटशिक्षणाधिकारी परांडा यांनी शिक्षकांना छान मार्गदर्शन केले . ज्ञानरचनावादी पद्धतीने सर्व मुलांना प्रगत बनविण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा दिली.

📌 भूम तालुक्यातुन समाधान शिकेतोड व दत्ता गुंजाळ यांना शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेले होते.
    
          ■ समाधान शिकेतोड ■
  📌समाधान शिकेतोड यांनी ज्ञानरचनावाद संकल्पना, तत्वे, ज्ञानरचनावादाचे स्त्रोत या वर चर्चा केली.
📌भाषा विषयाच्या वाचन, लेखन, आकलन या बाबतीत अप्रगत मुलांना समजून घेऊन प्रगत कसे करता येईल यावर चर्चा केली.त्यासाठी शोध,संशोधन व उपक्रम यावर मार्गदर्शन केले.
📌कुंमठे बीट सातारा येथील अनुभव व स्वतःचे अनुभव शेयर केले. शिक्षकांनी स्वतःचे अनुभव शेयर केले.
📌 मा.नंदकुमार साहेब प्रधान सचिव यांच्या प्रेरणेने राज्यात प्रयोगशील शिक्षक कसे विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी प्रयोग करत आहेत.अशा प्रयोगशील शिक्षकांच्या प्रयोगशीलतेबद्दल चर्चा केली. यामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळाली.
📌 ज्ञानरचनावादी वर्गाची वर्गरचना, बैठकव्यवस्था कशी करायला हवी.
C किंवा U आकाराची यावर चर्चा केली.
📌 अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करायला हवेत. विविध  App. द्वारे मुलांना अध्ययन अनुभव कसे द्यायचे याबाबत चर्चा केली.
📌  मुलांना भाषासमृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी समृद्ध अनुभव देता यावेत यासाठी शिक्षकांनी पालनिती,जीवनशिक्षण, शिक्षण वेध सारखी मासीके वाचावीत.भाषीक खेळ घेण्यासाठी अशा संदर्भ साहित्य पाहावे.
📌 विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावीत यासाठी क्वेस्ट च्या वेबसाईट बद्द्ल माहिती दिली.
www.quest.org.in
📌 महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक WhatsApp group बद्दल माहिती सांगितली.

            ■ दत्ता गुंजाळ ■
📌 दत्ता गुंजाळ यांनी गणित विषयातील अमुर्त संकल्पना विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी साधनांचा वापर कसा करावा हे उदाहरणासह समजावून सांगितले.
📌 कुंमठे बीट सातारा येथील अनुभव, उपक्रम शेयर केले.
📌 वर्गातील रचना करताना कोणते डायग्राम फरशीवर आखता येतील ते सांगीतले.
📌 भाषा व गणित विषयातील क्षमता कौशल्यांच्या विकसनासाठी कोणकोणते साहीत्य लागते त्याची यादी सांगितली.
परिसरातून हे साहित्य सहज उपलब्ध कसे करता येइल याबद्दल मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात ज्ञानरचनावाद या विषयावर आधारित काही प्रेरणादायी  व्हिडिओ शिक्षकांना दाखवले.
वाघमारे सर व चौरे सर यांनी ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन करताना आंतरक्रिया कशी घडते यावर सर्वांनी चर्चा केली.शिक्षकांनी मुद्दे लिहले.
कार्यशाळेतील उपक्रमशील शिक्षक नागनाथ गटकळ यांनी ज्ञानरचनावादी पद्धतीने मुलं कशी शिकतात.याचाप्रत्यक्ष अनुभव सांगितला.
राऊत सर यांनी पिंपळवाडी बीट मधील शिक्षकांचा WhatsApp group बनवावा असे विचार मांडले व लगेच ग्रुप तयार केला.
शिक्षण विस्तार अधिकारी फुलारी सर यांनी कार्यशाळेचे खुप छान नियोजन केले होते.

सर्वांनी पिंपळवाडी बीट अप्रगत विद्यार्थी विहीन करण्याचा संकल्प केला.

                                          शब्दांकन
                                      समाधान शिकेतोड