Thursday 10 January 2019

माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षक उद्बोधन कार्यक्रम टप्पा-2

*माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षक उद्बोधन कार्यक्रम टप्पा-2*
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
राज्यातील उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षणाचा दर्जा सुधारणे,अध्ययन निष्पत्ती/क्षमता यामधील राज्यातील 100% विद्यार्थ्यांची 75% संपादणूक वाढविणे यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे यांच्या मार्फत राज्य मंडळाचा अभ्यासक्रम चालवणा-या सर्व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षक उद्बोधन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यासंदर्भात घटकसंच निर्मितीची तिन दिवसीय कार्यशाळा सोरेना हिलसाईड रिसाॅर्ट पानशेत पुणे येथे दि.8 ते 10 जानेवारी दरम्यान संपन्न झाली.या कार्यशाळेत मा.विभाग प्रमुख (सर्व) SCERT पुणे. मा.अधिव्याख्याता,मा.अभ्यासमंडळ सदस्य,विषय सहायक,उपक्रमशील शिक्षक,प्रयोगशील मुख्याध्यापक सहभागी झालेले होते.

या कार्यशाळेला मा.सुजाता लोहकरे विभाग प्रमुख मराठी व मा.सर्व विभाग प्रमुख SCERT पुणे.यांनी मार्गदर्शन केले. शेवटच्या दिवशी सर्वांशी मा.जगराम भटकर,उपसंचालक SCERT पुणे यांनी संवाद साधला.
प्रत्येक मुलं शिकावं,वर्गांतरक्रिया अध्ययन निष्पत्ती आधारित व्हाव्यात,प्रत्येक मुलं शिकावं यासाठी राज्यातील उपक्रमशील शिक्षक,मुख्याध्यापक यांनी  केलेले रचनात्मक प्रयोग,मुल्यमापन पद्धती,कृतिपत्रीका याबाबत शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्यात एकाच वेळी संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment