Monday 4 March 2019

मुल वाचायला कसं शिकेल?


प्राथमिक शाळेत शिकत असताना मुलांना वाचन ही क्षमता विकसीत होणे खुप महत्वाचे असते.पालकांना सुद्धा आपल्या पाल्यांना लवकर अर्थपूर्ण मजकूर कधी वाचायला येईल.याची उत्सुकता,काळजी असते.
         मग प्रथम मुळाक्षरे नंतर बाराखडी,जोडशब्द हा प्रवास सुरू होतो.एक एक मुळाक्षर घोकमपट्टी करून लक्षात ठेवायला मुलांची दमछाक होते.पुन्हा सारी बाराखडी शिकायची.तोपर्यंत मुलांना अर्थपूर्ण मजकूर वाचायला मिळतच नाही.
         यासाठी  प्रथम एक अक्षरगट निवडून त्यावर काम व्हायला हवे. अक्षरगट असा निवडायचा की त्यापासून मुलांच्या भावविश्वातील शब्द तयार होतील.या अक्षरगटातील प्रत्येक अक्षरांची ओळख मुलांना करून देण्यासाठी काही कृती घ्यायच्या.
मुलांना खुप सारे शब्द माहित असतात.ते त्यांच्या बोलीत वापरतही असतात.पण आपण जे बोलतो ते लिहलं जात.ते टिकतं.ते वाचायचं असतं.
याची मुळात  जाणीवच नसते. यासाठी लेखी मजकुराची जाण मुलांना व्हावी यासाठी अक्षरगटावर काम करण्याअगोदर काही कृती घ्याव्यात. जसं मुलांना गावातील दुकान,व्यवसाय दाखवून आणल्यानंतर तो अनुभव सांगायला लावायचा.तो फळ्यावर लिहायचा. लिहलेलं पुन्हा मुलांना वाचून दाखवायचं.जास्त चित्र असणा-या पुस्तकातील मजकूर मुलांना वाचून दाखवायचा.चित्रावर गप्पा मारायच्या.हे सर्व अक्षरगटावर काम करण्याअगोदर करायला हवं बरं का.
       त्यानंतर एक अक्षरगट निवडून त्यावर काम सुरू करायचं.त्या अक्षरगटातील अक्षर म्हणजे एक आवाज आहे.तो आवाज मी जे शब्द बोलतो त्यात कुठंतरी आहे. असे आवाजाचे खेळ मुलांसोबत घ्यायला हवेत. यामुळे आवाज व त्या आवाजाची खुण याचा संबंध मुलांच्या लक्षात येतो.मुलांनी सांगीतलेल्या शब्दातचं ते अक्षर कुठं आहे. ते शोधायचं यामुळे आकार व आवाज याचा मुलांना सहसंबध लावता येतो.

या अक्षरगटातील अक्षरांच्या  दृढीकरणासाठी जुन्या वर्तमानपत्रातील अक्षरांना गोल करणे,धुळपाटीवर अक्षरे गिरवणे असे उपक्रम घेता येतील.या अक्षरगटात एक-दोन स्वरचिन्हे असायला हवीत.त्याला काना,मात्रा असं म्हणायचं नाही बरं. कारण मुलं पुढं वाचताना क कपाचं  कला काना का..असं वाचतात. मग अर्थ सुटून जातो. त्यामुळे काण्याला आ म्हाणायचं.
  या अक्षरगटापासून मग शब्द तयार करायचे. शब्दावरून अर्थपूर्ण मजकूर तयार करायचा. मुलं तो मजकूर वाचायला लागतात. पाच-सहा अक्षरं आणि एक-दोन स्वरचिन्हे घेऊन अक्षरगट तयार होतो. त्यावरील मजकूर मुले समजपूर्वक वाचन करतात.
पुढे अक्षरगटातील अक्षरे वाढवली तरी चालतील.मुलं वेगाने अर्थपुर्ण वाचायला लागतात.

या बद्दलचा एक छान अनुभव मला सांगावासा वाटतो.एकदा एका पहिलीच्या वर्गाला भेट दिली.त्या ठिकाणी मुलांना लिपी परिचय झाला होता पण अर्थपूर्ण वाचनाचा अनुभव मुलांना दिला गेला नव्हता.मुलांचे शब्द वाचन सुरु होते.वर्गातील मुलांना अक्षर गटावरील समग्र अर्थ असणारा वाचनपाठ वाचायला दिला.या उताऱ्यावरील आकलन व उपयोजनाच्या पातळीवरील प्रश्नांची उत्तरे त्या मुलाने अचूक दिली.अर्थातच पहिलीचे मुल सुद्धा अर्थपूर्ण वाचू शकते हा आत्मविश्वास शिक्षकांनाही आला.
अक्षर गट
               ा ी
                  
   (  या अक्षर गटात काना व दुसरी वेलांटी ही दोन स्वरचिन्हे आहेत.पण त्याला काना व वेलांटी न म्हणता आ व ई असा उच्चार करायचा आहे.)         
वाचनपाठ
काका आला.
काकी आली.
मामा आला.
मामी आली.
कमलाचा काका आला.
कमलाची काकी आली.
हा उतारा मुलाने उत्तम वाचला.त्याला दोन प्रश्न विचारले.
१) कोण कोण आले आहेत?
२) किती जण आले आहेत?
पहिल्या प्रश्नाचे उत्तर पटकन दिले.दुसरा प्रश्न विचारल्यावर मुलाने मनात उतारा वाचला.व्यक्ती मोजल्या व उत्तर अचूक सांगितले.सर्व वर्गानी टाळ्या वाजवल्या.मुल समजपूर्वक कसं वाचते .याचाहि अनुभव आला.
     
                           
चला  आपल्या मुलांना या टप्प्याने वाचन शिकण्याचे अनुभव द्यायला देऊयात .पाठ्यपुस्तकही अक्षरगट पद्धती उत्तम असल्याचे सांगत आलीत. चला मुलांना वाचनाचा समृद्ध अनुभव देऊ .......

17 comments:

  1. अगदी बरोबर

    ReplyDelete
  2. समाधान हा लेख आरंभिक वाचन शिकवताना नेमके काय करायला हवे हे सांगणारा झाला आहे.अनेक तांत्रिक बाबी तुम्ही सध्या सोप्या भाषेत मांडल्या आहेत. तुमचे या बाबतचे अनुभव वाचायला मी उत्सुक आहे.

    ReplyDelete
  3. धन्यवाद सरजी,आपल्या मार्गदर्शनामुळेच आम्ही समृद्ध झालो आहोत.अक्षर गट पद्धतीने मुलांसोबत काम केल्यावर मुलं वाचती झाल्याचे अनुभव नक्कीच शेअर करत जाईन.

    ReplyDelete
  4. मस्त आणि उपयुक्त आहे.लिहीत राहा

    ReplyDelete
  5. Super sir माझ्या शाळेतील मुले वाचू लागली आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आणि समाधान वाटत आहे आपले मार्गदर्शन खरोखर खूप मोलाचे ठरले त्रिवार धन्यवाद सर...

    ReplyDelete
  6. Natural process of learning.We should follow it....

    ReplyDelete
  7. इतर अक्षर गट सांगावेत. खुप छान

    ReplyDelete
  8. खूप छान सरजी...आपण जे बोलतो ते लिहलं जात.ते टिकतं. ... त्यासाठी आपले विचार व्यक्त करणे ...हे महत्त्वाचे..

    ReplyDelete
  9. अक्षरगट व मुलांचे अनुभव यामधून मूल लवकर शिकतो.

    ReplyDelete
  10. समाधान सर खूप छान लेख आहे.

    ReplyDelete
  11. खुपच उपयुक्त माहिती आहे.

    ReplyDelete