Saturday 27 July 2019

आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प प्रशिक्षण संपन्न

आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प प्रशिक्षण संपन्न
-----------------------------------------------------------------
दिनांक- 22 जुलै ते 24 जुलै 2019
स्थळ- हाॅटेल जिमखाना औरंगाबाद.

       🌈 प्रेरणा व संकल्पना 🌈
           *मा.वंदना कृष्णा*
      अप्पर मुख्य सचिव,शालेय
      शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई.

            📚 मार्गदर्शक📚
           *मा.प्रतिभा भराडे*
         राज्य शैक्षणिक समन्वय
    आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प

         *राज्य कार्यबल गट*
    आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मुलं शिकावं,एकविसाव्या शतकातील कौशल्य मुलांना प्राप्त व्हावीत. यासाठी राज्यातील शिक्षण विभागातील प्रेरक        अधिका-यांचे प्रशिक्षण औरंगाबाद येथे संपन्न झाले.*

   ⚡ *प्रकल्पाची उद्दिष्टे* ⚡
1) अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टानुसार मुलांना अध्ययन अनुभव देणे.
2) पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन अध्ययन अनुभव देणे.
3) विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य विकसीत करणे.
4) विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीची संधी उपलब्ध करून देणे.

📌  हा प्रकल्प पूर्व प्राथमिक वर्ग, इयत्ता पहिली व दुसरी इयत्तासाठी राबविण्यात येणार आहे.
📌 मराठी,गणित, इंग्रजी,वर्गवातावरण/शाळा वातावरण,परसबाग,शालेय व्यवस्थापन समिती व समाज सहभाग या घटकांवर काम केले जाणार आहे.
📌 प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-2012 ची मराठी,गणित,इंग्रजी या विषयाच्या इयत्तांची उद्दिष्टे, अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी रचनात्मक अध्ययन अनुभव दिले जाणार आहेत.
📌 मुलांना दिल्या जाणा-या अध्ययन अनुभवातुन चिकित्सक विचार(Critical Thinking),सर्जनशीलता  (Creativity)संभाषण (Communication),सहकार्य (Collaboration) ही एकविसाव्या शतकातील कौशल्य विकसीत केली जाणार आहेत.
📌 अंगवाडीतील मुलांसोबत काम करण्यासाठी अंगणवाडीताईचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. *आकार अभ्यासक्रमची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रचनात्मक काम केले जाणार आहे.*
📌 या प्रकल्पातमध्ये शिक्षकांना सातत्याने  मदत,सहकार्य,मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रेरक अधिकारी त्यांचे मेंटाॅर असतील.
📌  या प्रशिक्षणात प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन *राज्य कार्यबल गटाचे सदस्य तथा शिक्षण विस्तार अधिकारी मा.प्रविण काळम-पाटील,मा.रमेश ठाकुर व त्यांच्या टिमने केले.*
📌  यावेळी प्रादेशिक विद्याप्राधिकरणचे संचालक मा.डाॅ.सुभाष कांबळे,DIECPD औरंगाबाद चे प्राचार्य मा.डाॅ.कलिमोद्दीन शेख, DIECPD जालना चे प्राचार्य मा.डाॅ.राजेंद्र कांबळे,DIECPD बुलढाणाचे प्राचार्य मा.विजयकुमार शिंदे, यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

📌प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रम, गणित संबोध,भाषा,गणित,इंग्रजी साहित्य पेटीतील साहित्याचे व्यवस्थापन यावरही चर्चा,चिंतन झाले.

या प्रशिक्षणामुळे राज्यातील प्रेरक अधिकारी समृद्ध होऊन आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प राबविण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात नक्कीच या प्रकल्पामुळे रचनात्मक काम उभं राहिल असा विश्वास वाटतो.

           समाधान शिकेतोड
         DIECPD,उस्मानाबाद.

No comments:

Post a Comment