Monday 5 August 2019

आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प कार्यशाळा संपन्न

         आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प कार्यशाळा संपन्न
--------------------------------------------------------------------------------

       दिनांक- 3 ऑगस्ट 2019 
स्थळ- विद्याधन आश्रमशाळा घाटंग्री ता.जि.उस्मानाबाद.

               प्रवर्तक व संकल्पना 
              मा.वंदना कृष्णा 
              अप्पर मुख्य सचिव,शालेय 
              शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई.

         प्रेरणा 
            मा.डाॅ.संजय कोलते
              मुख्य कार्यकारी अधिकारी 
             जिल्हा परिषद उस्मानाबाद.
         
                                              ⚡मार्गदर्शक⚡                                    
           मा.डाॅ.आय.पी.नदाफ
       प्राचार्य
          DIECPD उस्मानाबाद.


              मा.सविता भोसले
             शिक्षणाधिकारी (प्रा.)
             जि.प.उस्मानाबाद 
        
        प्रेरक अधिकारी 
     1) श्रीमती.दैवशाला शिंदे 
        विस्तार अधिकारी (शिक्षण)
     2) श्री.समाधान शिकेतोड 
     विषय सहायक,DIECPD उस्मानाबाद.
  3) श्रीमती. सुकेशनी वाघमारे 
       केंद्रप्रमुख
  4) श्री.निलेश नागले 
       केंद्रप्रमुख

                                 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मुलं शिकावं,अभ्यासक्रमाची उद्दिष्टे,अध्ययन निष्पत्ती प्राप्त व्हाव्यात. एकविसाव्या शतकातील कौशल्य मुलांना प्राप्त व्हावीत. यासाठी ग्रामीण बीट उस्मानाबाद व नगर पालिका शाळा उस्मानाबाद मधील इयत्ता पहिली व दुसरीला अध्यापन करणा-या शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली.

⚡ *प्रकल्पाची उद्दिष्टे* ⚡
1) अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टानुसार मुलांना अध्ययन अनुभव देणे.
2) पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन अध्ययन अनुभव देणे.
3) विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य विकसीत करणे.
4) विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीची संधी उपलब्ध करून देणे.

 या प्रकल्पाच्या उद्दिष्टे,रूपरेषा यावर चर्चा केली. 
 मराठी,गणित, इंग्रजी,वर्गवातावरण/शाळा वातावरण,परसबाग,शालेय व्यवस्थापन समिती व समाज सहभाग या घटकांवर काम कसे करावे.याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. रचनात्मक काम केलेल्या शाळेविषयी चर्चा झाली. 
 लोकसहभागातून शाळा समृद्धी व गुणवत्ता विकास कसा साध्य करता येईल याबद्दल प्रेरक अधिका-यांनी महाराष्ट्रातील,जिल्ह्यातील काही शाळांच्या यशोगाथा सांगीतल्या.
 प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-2012 ची मराठी,गणित,इंग्रजी या विषयाच्या इयत्तांची उद्दिष्टे, अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी गटागटात अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टानुसार कृती घेतल्या गेल्या. त्यावर चर्चा झाली. 
 मुलांना दिल्या जाणा-या अध्ययन अनुभवातुन चिकित्सक विचार(Critical Thinking),सर्जनशीलता  (Creativity)संभाषण (Communication),सहकार्य (Collaboration) ही एकविसाव्या शतकातील कौशल्य विकसीत होण्यासाठी रचनात्मक अध्ययन अनुभव कसे द्यावेत याबद्दल चर्चा झाली.
 *माझी शाळा* चा एक एपिसोड दाखवून शिकवणं आणि शिकणं म्हणजे काय?यावर चिंतन केले.ज्ञानरचनावाद समजून घेतला.जुलै 2019 च्या जीवन शिक्षण अंकाबाबत चर्चा केली.
 या कार्यशाळेला मा.डाॅ.आय.पी.नदाफ,प्राचार्य,  DIECPDउस्मानाबाद.,मा.नारायण मुदगलवाड,विभाग प्रमुख मराठी,श्री.नेताजी चव्हाण विषय सहायक मराठी यांनी भेट दिली. मा.प्राचार्य महोदयांनी शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रम, गणित संबोध,भाषा,गणित,इंग्रजी साहित्य पेटीतील साहित्याचे व्यवस्थापन यावरही चर्चा,चिंतन झाले.वर्गातील अध्ययन अनुभवांचे शेअरींग केले.

आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून प्रेरक अधिकारी शिक्षकांना मदत,मार्गदर्शन,सहकार्य करणार आहेत.दर महिन्याला एक कार्यशाळा होणार असुन मुलांसोबत काम करतानाचे अनुभव शेअरींग,प्रत्यक्ष वर्गांतरक्रिया,मुलांचं शिकणं यावर चर्चा,चिंतन केले जाणार आहे.
            ‌‍समाधान शिकेतोड
         DIECPD,उस्मानाबाद.

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete