महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,क्वेस्ट व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक भाषा शिक्षण अभ्यासक्रम हा दीर्घ मुदतीचा कोर्स आयोजित करण्यात आला.तो मी पूर्ण केला आहे.यामुळे मला भाषा शिक्षणाची नवी दृष्टी मिळाली,माझी वैचारिक बैठक तयार झाली.मुलांसोबत काम करताना समृद्ध अनुभव मिळाले त्या निमित्ताने ............
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,युनिसेफ,क्वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक भाषा शिक्षण अभ्यासक्रम हा दीर्घ मुदतीचा कोर्स मी सन २०१८-२०१९ मध्ये पूर्ण केला. पुण्यात दोन दिवसाचे सत्र, एक ऑनलाइन चाचणी व प्रत्येक महिन्यात दहा पंधरा दिवस प्रत्यक्ष मुलांसोबत काम. असे या कोर्सचे स्वरूप होते.या कोर्सची एकूण नऊ सत्र होती.दर महिन्याला एक सत्र संपन्न होत असे. यापैकी एक सत्र क्वेस्टचे मुख्यालय सोनाळे जिल्हा पालघर याठिकाणी संपन्न झाले होते.प्रत्येक सत्र शिक्षणतज्ञ निलेश निमकर हे घेत असत.प्रत्येक सत्र वेगवेगळ्या विषयावर असे.यामध्ये आम्हाला काही लेख टिपण वाचायला दिले जाई.त्यावर चर्चा होत असे.वेगवेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या परीस्थितीमध्ये मुलांसोबत केलेल्या रचनात्मक कामाचे अनुभव सांगितले जात.मुलांना गोष्टी सांगणे,सहभागी वाचन, अक्षर गट व वाचन पाठ,प्रकट वाचन,मुलांसोबत पुस्तक तयार करणे,मुलांच्या वाचनाचे रनिंग रेकॉर्ड घेणे व त्यांचे विश्लेषण करणे,स्तराधारित अध्ययन कार्यक्रम,पुस्तकावर मार्गदर्शीत लेखन,ग्रंथालयाचे उपक्रम या विषयावर सत्रे संपन्न झाली होती.
प्रत्येकाला एक मेटॉर होते,ते प्रत्येकाला मार्गदर्शन करत होते.मला मीना निमकर ह्या मेंटॉर होत्या.दररोज मुलांसोबत केलेल्या कामाचे त्यांच्यासोबत शेअरिंग करत होतो.त्यांचा प्रतिसाद घेऊन माझ्या मुलांसोबतच्या कामात बदल करत गेलो.या कोर्समुळे मला भाषा शिक्षणाची नवी दृष्टी मिळाली.माझ्या जुन्या धारणा बदलल्या.प्रत्यक्ष 80 दिवस मुलांसोबत काम केल्यामुळे खूप समृद्ध अनुभव मिळाले.भाषा शिक्षणाच्या बाबतीत जे रचनात्मक काम जगभरात झालेले आहे त्याबद्दलची माहिती मिळाली. स्वतः समृद्ध होत गेलो.
मी एक प्राथमिक शिक्षक आहे.माझ्या शाळेवर मी वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करत होतो.पण आता या कोर्समुळे मला शास्त्रीय दृष्टीकोन मिळाला आहे.माझी भाषाशिक्षणाची वैचारिक बैठक तयार झाली.मी सध्या DIECPD उस्मानाबाद येथे मराठी विषयासाठी Teacher Educator म्हणून काम करत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कार्यशाळा व प्रशिक्षणासाठी या शिकलेल्या बाबींचा उपयोग करता आला. राज्यस्तरावर शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणाची मोड्यूल तयार करणे,घटकसंच निर्मिती करणे,प्रशिक्षक म्हणून काम करताना या कोर्समधील शिकलेल्या बाबींचा खूप उपयोग झाला.या कोर्समुळे मला स्वतःला समृद्ध करता आले.म्हणून मी भाषा विषयाचा Language Pedagogy Expert म्हणून जिल्हा,राज्य अशा विविध ठिकाणी पूर्ण क्षमतेने काम करत आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षक व पर्यवेक्षीय यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे.या सर्व कार्यक्रमांमध्ये राज्य, जिल्हा स्तरावर या कोर्समुळे सक्रिय सहभाग नोंदवत आला.राज्यस्तरावर मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम,स्तराधारित अध्ययन कार्यक्रम,माध्यमिक शिक्षक उद्बोधन कार्यक्रम,समजपूर्वक वाचन क्षमता विकास कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे मॉडेल तयार करणे,घटकसंच निर्मिती,प्रशिक्षक तयार करणे यामध्ये या कोर्सचा उपयोग झाला. अध्ययन निष्पत्ती आधारित मुलांना अध्ययन अनुभव देण्यासाठी विविध भाषिक अनुभवांची रचना करायला मदत मिळाली.जिल्हास्तरावर अध्ययनस्तर निश्चिती कार्यक्रम, स्तराधारित अध्ययन कार्यक्रम,समजपूर्वक वाचनाचा पथदर्शी प्रकल्प या कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता आली.राज्यातील,जिल्ह्यातील प्रत्येक मुल भाषिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी या भाषा शिक्षणाच्या कोर्समुळे नव्याने कार्यप्रेरणा मिळाली आहे.
छान आणि सविस्तर लिहीलंय सर! तुम्ही या कोर्समधील सत्रांचा आणि मेंटारने दिलेल्या मार्गदर्शनाचा पुरेपुर वापर करून घेतलात म्हणून तुम्हाला व्यावसायिक जिवनात समृद्ध झाल्याचा आनंद मिळतोय. अभिनंदन आणि तुमच्या पुढील कामासाठी शुभेच्छा!
ReplyDeleteसमाधान वाटलं...!
ReplyDeleteअसाच उत्तरोत्तर वाढत राहा...
शुभेच्छा...
Very nice sir
ReplyDeleteभाषाशिक्षण व भाषाविकासासाठी आपण जे जे काही करता त्यामुळे आपल्याही भाषेत, लेखनात खूप प्रगल्भता आली आहे. अत्यंत सकस लिहीलंय सर तुम्ही. आम्हालाही हा कोर्स करायची संधी मिळेल का?
ReplyDeleteसमाधान,मित्रा तुझा आम्हाला रास्त अभिमान वाटतो.
ReplyDeleteVery nice sir you are already a great fellow.hearty Congratulations sir
ReplyDeleteVery nice
ReplyDelete