Saturday, 28 February 2015

स्वच्छतेचं भारूड

संतानी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी भारूडाच्या माध्यमातुन लोकजागृती केली.मनोरंजन आणि प्रबोधन दोन्हीही घडायचं.
     मी लहान असताना माझ्या गावी भारूडं व्हायची.काही लोकप्रिय भारूडं आजही आठवतात.त्याची गायनाची लकब खुपच छान असते.
शाळेत आज सहजच मुलांच्या वैयक्तीक स्वच्छतेच्या संर्दर्भात भारूड तयार करून मुलांसोबतत गायलं. मुलं आनंदान नाचू लागली.स्वच्छतेविषयीच्या चांगल्या सवयी,बाबी त्यांना समजल्या.
हा वेगळा प्रयोग तुम्हीही करून बघायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment