Sunday, 19 April 2015

                                                   तंत्र शिक्षणाची नवी पहाट

            १८ एप्रिल रोजी तंत्रास्नेही शिक्षकांची सहविचार सभा विद्यापरीषद येथे संपन्न झाली. या सहविचार सभेसाठी सबंध महाराष्ट्रातून तंत्रस्नेही शिक्षक आलेले होते. IIT मुंबई, MKCL व इतर काही कंपन्यांचे प्रतिनिधी या सभेसाठी उपस्थित होते. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब , आयुक्त शिक्षण भापकर साहेब , शिक्षण संचालक जरग साहेब यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 
            मा.जरग साहेबांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मा. नंदकुमार साहेबांनी MOTIVATION बद्दल खूप  छान उदाहरनासह चर्चा केली. TECH SAVVY TEACHERS या  WhatsApp वरील ग्रुप मधून सर्व तंत्रस्नेही शिक्षक कशा पद्धतीने एकत्र आले याबद्दल सांगितले. महाराष्ट्रातील सर्व शाळा २०२० पर्यंत डिजिटल स्कूल व सर्व  TECH SAVVY कसे बनतील यासाठी आराखडा बनवण्याविषयी चर्चा झाली. संदीप गुंड या शिक्षकाने केलेली पास्टेपाडा हि शाळा डिजिटल कशी बनवली व संदीप ची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अशा पद्धतीचे काम सुरु झालेले आहे याबद्दल सांगितले. 
             यानंतर तंत्रस्नेही शिक्षकांनी महाराष्ट्राच्या डिजिटल स्कूल च्या व्हिजन बद्दल सादरीकरण केले. 
  1. अनिल सोनुने- अनिल सोनवणे यांनी शिक्षकांची पाच गटात विभागणी केली व प्रत्येक गटाची उद्दिष्टे व कार्यपद्धती या बद्दल PPT च्या सहाय्याने माहिती दिली. ते गट पुढील प्रमाणे.
1.      प्रोत्साहन
2.      शिक्षक गुणवत्ता
3.      प्रशासकीय व्यवस्थापन
4.      विद्यार्थ्यांसाठी सहज सोपी तंत्रासाधने
5.      विनामूल्य अथवा कमीत कमी खर्चात संसाधने
2.      बालाजी जाधव – बालाजी जाधव यांनी शिक्षकांनी USER न होता creator व्हा असा सल्ला दिला. स्वतःच्या बेब साईट विषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले कि व्हिडीओ निर्मिती कौशल्य आत्मसात करायला हवे. त्यांनी स्वतः १३० व्हिडीओ बनवल्या आहेत.
3.      सुरेश भारती – पहिलीपासून माहिती तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करण्यात यावा त्यासाठी पाठ्यक्रम बनविला जावा. ICT ची परीक्षा व्हावी. कार्यानुभव या विषयातील माहिती तंत्रज्ञान हा विषय अनिवार्य असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
4.      संदीप गुंड – संदीप गुंड यांनी स्वतःच्या शाळेचा व्हिडिओ दाखवला. त्यांच्या डिजिटल स्कुल विषयी PPT च्या सह्हायाने माहिती सांगितली. डिजिटल स्कूल मध्ये interactive learning चे महत्व सांगितले. त्यांच्या शाळेतील मुले स्वतः TAB कसा हाताळतात, मुल स्वतः स्वतः च्या TAB च्या सह्हायाने मूल्यमापन कसे करतात हे सांगितले. मुलांच्या घरीही TAB द्वारे अभ्यास करण्यासाठी TAB TV ला जोडण्याची सोय करण्यात आलेली आहे.
अशा पद्धतीने समाज सहभागातून शाळेचा तांत्रिक विकास कसा केला व आदिवासी पाड्यावर तंत्रशिक्षणाची नवी पाहत कशी उगवली याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले.
5.      सावंत साहेब – MKCL चे व्यवस्थापकीय संचालक यांनी बालभारतीच्या पुस्तकांना स्टीकर चिटकवले जावेत. पुस्तकात video, audio, multimedia content तेथे जोडला जावा असे सांगितले.
पुस्तक आणि वडिलांचा मोबाईल फोन यामुळे एकत्र येईल. पुस्तकं आकर्षक होतील त्यामुळे मुलांचा गळतीचा प्रश्न मिटेल. यामुळे ज्ञानराचानावादी शिक्षण मुलांना मिळेल. शिक्षण वेध व जडण घडण या मासिकात ई शिक्षणाच्या संदर्भातील लेख ते लिहित आहेत याबद्दल सांगितले.
6.      रणजीत देसले – यांनी शिक्षक पालक गट कसा तयार केला व त्यातून गुणवत्ता विकासास कशी मदत झाली याविषयी अनुभव कथन केले.
7.      प्रा. भुतडा सर – यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या software ची माहिती दिली व त्यांची उपयुक्तता सांगितली.
8.      सुनील आलोरकर – त्यांच्या z.p.guruji.com या वेब साईट विषयी माहिती सांगितली. या वेब साईट वर असलेल्या वेगवेगळ्या मार्गदर्शक व्हिडिओ शिक्षकांना दाखवले व याद्वारे शिक्षक स्वतः तंत्रास्नेही होऊ शकतात हे सांगितले.
9.      सोमनाथ वाळके – यांनी आपल्या शाळेत मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडीओ तयार केला आहे. विविध software चा उपयोग करून गुणवत्ता विकास साधला जावा हे सांगितले.
10.  राम सलगुडे – यांनी स्वतः च्या ब्लॉग द्वारे पेपर लेस स्कूल कसे केले याबद्दल सांगितले.
अशा बऱ्याच तंत्रस्नेही शिक्षकांनी सादरीकरण केले, व्हिडिओ दाखवले. मा. नंदकुमार साहेबांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. भाऊसाहेब चासकर यांनी सुंदर संचलन केले.
मा. भापकर साहेब (आयुक्त शिक्षण) यांनी तंत्रास्नेही शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. डिजिटल स्कूल करण्यासाठी शिक्षकांना संपूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले.
मा. जरग साहेबांनी सर्व तंत्रास्नेही शिक्षकांनी जीवन शिक्षण साठी आपण राबवत असलेल्या प्रयोगाबद्दल लेख पाठवावे असे आवाहन केले. तंत्राशिक्षानाबद्दल जीवनशिक्षण व्हा स्वतंत्र अंक काढला जाईल असे सांगितले.
प्रशांत कऱ्हाडे, संतोष भोंबळे यांनी TECH SAVVY TEACHERS या WhatsApp ग्रुप च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व तंत्रास्नेही शिक्षकांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळेच तंत्रशिक्षणाची वाटचाल वेगाने सुरु झाली.
आजच्या सहविचार सभेतून एक नवीन उर्जा घेऊन प्रत्येक जन जात होता. ONLINE भेटणारा मित्र आज OFFLINE भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. नंदकुमार साहेबांची प्रेरणा घेऊन अहोरात्र परिश्रम करणारे तंत्रस्नेही शिक्षकांनी आपापली कौशल्य येथे SHARE केले. मगर साहेबांनी छान मार्गदर्शन केले. विद्यापरीषदेने या सहविचार सभेचे उत्कृष्ट नियोजन केले होते.