Saturday, 4 April 2015

चला Tech savvy बनू या....

नमस्कार,
   तंत्रस्नेही मित्रांनो.
आज सर्वजण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने नवनविन प्रयोग करत आहोत.वेगवेगळे App बनवले जात आहेत.सलग सहा,सात तास संगणकावर काम करणा-या मित्रांचा तर अभिमान वाटतो.ई शिक्षणाची ही भरारी महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीला उभारी देणारी आहे.महाराष्ट्रात यासंदर्भात कार्यशाळा होत आहेत.
आदरणीय नंदकुमार साहेबांची प्रेरणा व मार्गदर्शनामुळे शिक्षकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.संपूर्ण राज्यात ही चळवळ हळूहळू पसरत आहे. ब्लाॅग व वेबसाइट द्वारे अध्ययन अध्यापनात नाविन्य वाढले आहे.शिष्यवृत्ती परिक्षेचा सराव मुले आॅनलाईन टेस्ट द्वारे करत आहे.मुलांची  क्रियाशिलता व शिक्षणातील अभिरूची वाढलेली आहे.
अनेक whatapp च्या शैक्षणिक ग्रुप मधून मुलांच्या गुणवत्तेबाबत शिक्षकात आंतरक्रिया घडत आहे.
संदीप गुंड सरांचा तर राष्ट्रपती भवनात झालेले कौतुक सर्वांनाच प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे.
         रात्रंदिन आम्हा
          एकच ध्यास
        मुलांचा गुणवत्ता
       विकास ....गुणवत्ता विकास....