Monday 25 May 2015

मुलांना समजून घेताना

ही आजची वैशाली गेडाम यांची Whatapp वरची पोस्ट.....चिंतनीय....

वैशाली गेडाम:-

माझ्या पहिल्या वर्गातील मुले देखील स्वतःची हजेरी स्वतः लावण्यास उत्सुक असायचे. त्यांच्यासाठी ती आनंदाची गोष्ट असायची . हजेरी लावणे हे आव्हान समोर असल्यामुळे मुले आपलं नाव लवकर लिहिण्या वाचण्यास शिकतात. मग त्यांना आपल्या मित्र मैत्रिणीचृ पण नाव हजेरीत बघण्याची इच्छा होते. या इच्छापूर्तीच्या गरजेतून मुले एकमेकांची नावे वाचण्यास शिकतात. अक्षरांशी ओळख होते. एवढेच नाही मुले आपले नाव कितव्या नंबरवर आहे, मित्राचे , मैत्रिणीच नाव किती नंबरवर आहे हे पण बघण्यस उत्सुक असतात. त्यामुळे संख्यावाचन ही गरज निर्माण होते व मुले संख्यावाचनाकडे वळतात. शिकतांना गरज भासायला हवी, समोर आव्हान हवे, उद्देश हवा म्हणजे मुले लवकर लवकर शिकतात. असे शिकणे आनंददायी कायमस्वरुपी असते. म्हणजे विसरणे ही समस्या निर्माण होत नाही. अर्थात हे एक उदाहरण आहे. अशा अनेक गरजा, आव्हाने, उद्देश निर्माण करुन शिकणे आनंददायी व सहज सोपे करता येते. अशा पद्धतीने शिकतांना शिक्षकांना काहीच सायास पडत नाहीत. केवळ कल्पक नियोजने करावी लागतात .......आणि मुलांवर प्रेम तर असतेच.                                                  
-वैशाली गेडाम

...........................................................

हजेरी हा दस्तावेज मुलांचा आहे. त्यामुळे हा दस्तावेज हाताळण्याची संधी त्यांना मिळायलाच हवी. तिसऱ्या वर्गातील मुले हजेरी बुकातील सर्व रकान्यांमधील माहिती स्वतः लिहू शकतात. किंबहुना ते त्यांनीच लिहायला हवं. तिसरीपासून पुढे मुलांनीच हे रजिस्टर भरायला हवं. मुलं, दैनंदिन उपस्थिती , मुलांची संख्या , मुलींची संख्या , एकूण उपस्थिती वगैरे लिहितात. हे सर्व करतांना मुलांची अक्षरे चांगली होतात कारण हजेरी बुक चांगलं दिसलं पाहिजे हा उद्देश असतो. गणितही पक्क होतं. पहिल्या दुसऱ्या वर्गाची हजेरी लिहिण्याची जबाबदारी पण वरच्या वर्गातील मुलांकडे द्यावी. ते ती आनंदाने पार पाडतात. सहावी सातवीच्या मुलांना दैनंदिन उपस्थितीचे शेकडा प्रमाण काढण्याची जबाबदारी द्यावी. सर्व शिक्षण कामांमध्ये दडलंय. कोरडे विषय शिकविण्यात काही अर्थ नाही. कामातून शिकण्यास पर्याय नाही. काम म्हणजे मूर्त ज्ञान.                                          - वैशाली

.........................................................

वैशालीताई माझ्या मते आपण  मुलांना खरंखुरं समजून घेत आहात.त्यासाठी कल्पकता तर हवीच पण मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांच जग समजून घ्यायला हवं.
अगदी मनमोकळेपणानं मुलांशी संवाद साधायला हवा.
तुला काय कळत यातलं?
हा शहाणपणा दूर ठेवायला हवा.स्वत:ची हजेरी स्व:त भरणं तसं साधी गोष्ट वाटली तरी खुप महत्त्वाची वाटते.

खरचं छान समजून घेतायत वैशालीताई आपण मुलांना.....

No comments:

Post a Comment