Tuesday 27 October 2015

संकल्प ज्ञानरचनावादाचा

"संकल्प ज्ञानरचनावादाचा"

आज भुम येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात "संकल्प ज्ञानरचनावादाचा "या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

यामध्ये कुंमठे बीट येथे भेट देऊन पाहणी करून आलेले,रचनावाद समजून घेतलेले शिक्षक व ज्यांनी रचनावादी काम स्वयंस्फुर्तेने सुरू केलेले आहे. असे शिक्षक एकत्र आलेले होते.

प्रत्येकांनी रचनावादाबद्दल चे अनुभव शेयर केले. रचनावादी अध्ययन अनुभव मुलांना कसे दिले जावेत. यावर चर्चा केली.

भाषा व गणित विषयातील क्षमता कौशल्यांच्या विकसनासाठी कोणकोणते साहीत्य लागते.रचनावादी वर्ग,शाळा तयार करण्यासाठी पालकांचा सहभाग कसा घ्यावा.
रचनावादी वर्गाध्यापनामध्ये कोणत्या कृती करता येतील यावर चर्चा केली.

रचनावादी अध्ययन अनुभव देण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध ज्ञानाचे स्त्रोत उपलब्ध करून द्यावे लागतील.
📌 पुरक वाचन साहित्य, तंत्रज्ञान, ध्वनी फिती, पाठ्यपुस्तके, क्षेत्रभेट, परिसर सर्वेक्षण
यावरही चर्चा झाली.
भुम तालुक्याचे प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी मा.शेख साहेब यांनी सर्वंकष मार्गदर्शन केले. समस्या समजून घेतल्या.

या कार्यशाळेसाठी सर्व साधनव्यक्तीनी मदत केली.
पुढे रचनावादी शाळेवर भेटायचे ठरले.

No comments:

Post a Comment