Monday 1 February 2016

भाषाशिक्षण

●  भाषाशिक्षण●

स्थळ - कन्या प्रशाला उस्मानाबाद
   दिनांक - 30 जानेवारी 2016

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जि.प.उस्मानाबादच्या शिक्षण विभागाने " भाषाशिक्षणातील ज्ञानरचनावाद" या विषयावर जिल्ह्यातील नवोपक्रशील शिक्षकांची कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मिरज येथील  प्रयोगशील मुख्याध्यापक बाळासाहेब लिंबीकाई यांना बोलावण्यात आलेले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन उस्मानाबाद जि.प.चे शिक्षण सभापती मा.सुधाकर गुंड सर, शिक्षणाधिकारी मा.सचिन जगताप यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी मा. कादर शेख,मा.रोहिणी कुंभार व शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.

📌 मा.शिक्षणाधिकारी साहेबांनी शिक्षकांशी संवाद साधला. ज्ञानरचनावादाबद्दल मार्गदर्शन केले.भरपूर वाचन करून शिक्षकांनी समृद्ध व्हावे असे सांगितले.
📌 मा.शिक्षण सभापती यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले.

      ■ बाळासाहेब लिंबीकाई ■
मा.बाळासाहेब लिंबीकाई यांनी PPT व व्हिडीओ यांच्या साहाय्याने शिक्षकांशी संवाद साधला. मुलांची वाचन लेखन पुर्वतयारी कशी करावी यासाठी कोणकोणते उपक्रम घ्यायला हवेत हे सांगीतले. व्हिडिओ दाखवले.
📌  भाषा म्हणजे काय? तिचे महत्त्व  समजून देताना ,घरचीभाषा व शाळेतली भाषा या विषयी चर्चा झाली. लिपी परिचय ,मुळाक्षरे  त्यांचे आवाज, आवाजाचे उपक्रम, अक्षराच्या वाचन लेखनाची शास्त्रीय पद्धत सांगितली.मुळाक्षर,शब्द,वाक्य यांचे वाचन मुले भाषा कशी  शिकतात.याबाबतचे विविध संशोधने , सिद्धांत यांची मांडणी केली.व्यापक शब्दानुभव,वाक्यानुभव कसा द्यावा हेही विविध उदा.नी स्पष्ट केले.
📌 क्वेस्ट ने तयार केलेले वाचन लेखन कार्यक्रमावरचे व्हिडिओ शिक्षकांना दाखवले . प्रत्येक व्हिडिओ वर चर्चा करणेत आली.

📌  मुलं वाचलेले आकलन कशी करतात. हे समजण्यासाठी कार्यशाळेतील शिक्षकांना वाचनाचे काही नमुने दिले व वाचन केले.
अर्थपूर्ण वाचन कसे करावे?याचा अनुभव घेतला.
  📌टाॅप डाऊन व बाॅटम अप हे वाचनाचे दृष्टीकोन उदाहरणासह समजावून सांगितले व यावरच वाचनाच्या पद्धती कशा ठरतात हे सांगितले.
📌 श्रुतलेखन करताना मुले का चुका करतात? शुद्धलेखनाचे संकेत, उच्चार,मुळाक्षरांचा आवाज यावर चर्चा झाली. कार्यशाळेतील शिक्षकांनी श्रुतलेखन करून पाहिले.
  📌 विषयज्ञान व अध्यापनशास्त्र(पेडाॅगाॅजी) याबाबतीत शिक्षकांनी समृद्ध व्हायला हवे.

📌     भाषा शिक्षणाच्या बाबतीत ताराबाई मोडक,लिलाताई, निलेश निमकर, रमेश पानसे - ग्राममंगल यांनी जे काम केलेले आहे त्यावर चर्चा केली.

📌       शेवटी मुलांच्या लेखन समृद्धिसाठी  मिरज पंचायत समितीने तयार केलेला  "बीज अंकुरे अंकुरे "या माहितीपटातील काही प्रसंग दाखवले.
📌  संपूर्ण कार्यशाळेमध्ये शिक्षकांमध्ये आंतरक्रिया घडत होती.

उपयुक्त संकलित डाटा व व्हिडीओ शिक्षकांनी स्वतःच्या पेनड्राइव मध्ये घेतले.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी मा.संतोष माळी व मा.सोमनाथ घोलप यांनी परिश्रम घेतले.
अशा उत्तम प्रकारची कार्यशाळा घेतल्याबद्दल सर्व शिक्षकांनी शिक्षण विभागाचे आभार व्यक्त केले.

  संपूर्ण कार्यशाळेमध्ये शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला.
                            
                               शब्दांकन
                       समाधान शिकेतोड

No comments:

Post a Comment