Sunday, 10 April 2016

शाळा सिद्धी

शाळा सिद्धी : मूल्यमापन व शाळा सुधार
-------------------------------------------------
राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुल्यांकन व प्रमाणिकरण करण्यासाठी व शाळांची शैक्षणिक, भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीसाठी राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळा सिद्धी हा कार्यक्रम समृद्ध शाळा या नावाने राज्यातील  72  शाळांमध्ये सुरू केलेला आहे. यासाठी प्रत्येक जिल्हातील दोन उत्कृष्ट शाळांची निवड केलेली आहे.

अकोला जिल्ह्यातील जि.प कें.वरिष्ठ प्राथमिक शाळा सांगळूद
ता.जि अकोला या शाळेला शाळा सिद्धी कार्यक्रमातर्गंत असेसर (निर्धारक ) म्हणून दि.21 व  22 मार्च रोजी भेट दिली .

📌 शाळा सिद्धी मधील प्रत्येक क्षेत्र शाळेस नाविन्यपुर्ण उपक्रम आणि शाळेची बलस्थाने नोंदवण्याची संधी देते . या आरखड्याच्या पलिकडेही इतर उपक्रम शाळा राबवित असेल तर त्याचा स्विकार करते. (संदर्भ -शाळा सिद्धी पुस्तिका )

  📌 शाळा खुपच छान व उपक्रमशील होती.भौतीक सुविधांनी परिपूर्ण होती. ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, शालेय आवार, पेय जल या सर्वांचा उच्च दर्जा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन पोषक वातावरणात घडून येत होते.

📌 प्रत्येक मुल आत्मविश्वासाने बोलत होते. सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मला काही इंग्रजीतून प्रश्न विचारले. प्रत्येक वर्गात अध्ययनासाठी पोषक वातावरण तयार झालेले होते.

📌 विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शालेय विषयातील प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक, वैयक्तिक हिताची जपणूक सहशालेय उपक्रम राबवून केलेली दिसून आली.
पाखरांची शाळा, शैक्षणिक सहल, परिसर भेट, बाल आनंद मेळावा, बचत बॅंक, वाचन प्रकल्प, परस बाग, गांडूळखत प्रकल्प, मॅजिक बाॅक्स,स्वच्छ सुंदर शाळा, स्नेहसंमेलन अशा सहशालेय उपक्रमांची रेलचेल होती.

📌  शिक्षकांमध्ये संघभावनेमुळे  चैतन्य निर्माण झालेले होते.विद्यार्थी हितासाठी धडपडणाऱ्या या शिक्षकांचा अभिमान वाटला.

📌  शालेय नेतृत्व खुपच सकारात्मक, उर्जस्वल व प्रयत्नशील होते शिक्षकांमध्ये उर्जा निर्माण करून नवोपक्रशीलतेतुन अध्ययन-अध्यापनात सातत्याने सुधारणा करण्यासाठी प्रयोगशील होते.

📌  CWSN विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांसोबत आनंददायी वातावरणात शिकत होते प्रत्येक बालकाला समान संधी मिळत होती.

📌 समाजाचा कृतीयुक्त सहभाग शाळेसाठी दिसून आला.श्री. महेंद्र काळे या ग्रामस्थाने शुद्ध जलयंत्र (Water Purifier ) शाळेसाठी दिले होते.डिजीटल रूमसाठी 25000/- रू. ज्याचा पाल्य शाळेत नाही अशा व्यक्तीने दिलेले होते.

📌 मा.ना.रणजीत पाटील साहेब पालकमंत्री यांनी तिन लाख रुपये रकमेचे शाळेत पेवर्स ब्लॉक बसवून दिले होते.अजून मदतीचा ओघ चालूच होता.त्यामुळे शाळा समृद्ध बनली होती.

📌 गुणवत्तेचे प्रेरणादूत म्हणून शिक्षकांना शाळेतील कच्च्या दुव्याबाबत मार्गदर्शन केले.
आरंभिची सभा व शेवटची सभा उत्साहात पार पडली. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व उपअध्याक्षा उपस्थित होत्या.

📌 काही पालकांशी चर्चा केली. शुभम मानकर या सिव्हील सव्हीसेस
(UPSC )करणार्‍या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी चर्चा केली. खुपच सकारात्मक दृष्टिकोण होता सर्वांचा.

असेसर
1) समाधान शिकेतोड
2)  रमेश माने

                                  शब्दांकन
                            समाधान शिकेतोड
                             "असेसर" शाळा सिद्धी