Saturday, 2 April 2016

शाळा सिद्धी

शाळा सिद्धी : मूल्यमापन व शाळा सुधार
-------------------------------------------------
राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुल्यांकन व प्रमाणिकरण करण्यासाठी व शाळांची शैक्षणिक, भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीसाठी राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळा सिद्धी हा कार्यक्रम समृद्ध शाळा या नावाने राज्यातील  72  शाळांमध्ये सुरू केलेला आहे. यासाठी प्रत्येक जिल्हातील दोन उत्कृष्ट शाळांची निवड केलेली आहे.
अकोला जिल्ह्यातील जि.प कें.वरिष्ठ प्राथमिक शाळा ब्रम्ही ता.मुर्तीजापूर

ता.जि अकोला या शाळेला शाळा सिद्धी कार्यक्रमातर्गंत असेसर (निर्धारक ) म्हणून दि28 व  29 रोजी भेट दिली .

ज्ञानरचनावाद, डिजीटल स्कूल, ABL असणारी ही शाळा आहे . उमेश सराळे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे तंत्रस्नेही मुख्याध्यापक आहेत. शाळेतील सर्वचजण प्रचंड मेहनती व कल्पक आहेत. गावातील
95 % कुटूंब संख्या द्रारिद्यरेषेखाली आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीत शाळा समृद्ध करण्याचा ध्यास कौतुकास्पद आहे.

📌  प्रत्येक वर्गात संगणक असुन मुले संगणक आत्मविश्वासाने हाताळतात.
📌  डिजीटल क्लासरूम मध्ये प्रोजेक्टर व इंटरएक्टिव बोर्ड आहे.तंत्रज्ञानाचा उपयोग अध्ययन-अध्यापन होत आहे.
📌 शाळेत 131 उपक्रम राबविले जातात.
     टेलिस्कोपच्या साह्याने सुर्यावरील दाग व आकाशदर्शन विद्यार्थ्यांना दाखवले जाते.
📌  5 वी, 6 वी, 7 वी मधील विद्यार्थी ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकत आहेत.
स्वतः नाट्यसंहीता तयार करून आमच्या समोर नाट्यीकरण सादर केले.
📌  ज्ञानरचनावादातून भाषाशिक्षण विद्यार्थी घेत आहेत. भाषिक खेळ, शब्दकोडी यांच्या साहाय्याने भाषा शिक्षण घेत आहेत.
📌 क्रिडांगण प्रशस्त असुन सर्व खेळ मैदानावर विद्यार्थी खेळतात. स्वतः शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सराव करतात. अनेक क्रिडा स्पर्धेत बक्षिसे मिळवली आहेत.
📌 शाळेचा पेपरलेस प्रशासनावर भर. यासाठी स्वतः मुख्याध्यापक उमेश सराळे यांनी साॅप्टवेअर्स तयार केली आहेत.
📌 मुख्याध्यापक उमेश सराळे स्वतः इइटरअॅकटीव्ह बोर्ड बाबत संशोधन करत आहेत. अगदी कमी किमतीत हा बोर्ड लवकरच सर्वांना मिळेल असे त्यांनी सांगितले.
📌 मॅग्नेफायर व ब्ल्यू टूथ चा वापर करून मोबाइल डिजीटल स्कूल केली आहे.
📌  केंजळच्या मुख्याध्यापकाबरोबर ब्रम्ही च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी ऑडिओ काॅन्फरशींग मुख्याध्यापक सराळे सरांनी घडवून आणली.चर्चेत सर्वांनी सहभाग नोंदविला.
📌 शाळेतील 100%  विद्यार्थ्यांना घरच्या पत्त्यावर "किशोर " मासीक येते. किशोर मासीकामध्ये विद्यार्थी लेखन करतात.
📌 शाळेचे ग्रंथालय विद्यार्थी स्वतः चालवतात.
📌 शाळेतील मुलांच्या ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकण्याचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत.
📌  कला,कार्यानुभव, शारिरीक शिक्षण या विषयाचे उपक्रम, प्रकल्प व  प्रात्यक्षिक अप्रतिम होते.
📌 एका विद्यार्थीनीची "डान्स इंडिया डान्स" या टिव्ही शो च्या ऑडीशन साठी निवड.
      ● लोकसहभाग●
📌  95 %कुटूंब संख्या द्रारिद्यरेषेखाली असुनही जवळपास 150000/- रू. लोकसहभागातून जमा केले आहेत.
📌 देणगीदारांची नावे डिजीटल बॅनर वर लावली आहेत.
📌 स्वतः मुख्याध्यापक उमेश सराळे व त्या शाळेतील शिक्षिका श्रीमती. राजश्री तिडके - सराळे यांनी प्रत्येकी  21000/- रू. देणगी शाळा विकासासाठी दिली आहे.

  ●मिशन ●
📌 लवकरच शाळेसाठी सोलर किट ,थ्रिडी रूम, ई वाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा या गोष्टी करणार.

  शेवटी शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समिती, शिक्षण प्रेमी नागरिक यांच्याशी संवाद साधला.
  लगेच गावाला मिळालेल्या पारितोषिकातुन काही रक्कम शाळेला देण्यात येईल असे ठरले.

शाळेला भेट दिल्यामुळे आम्हालाही खुप काही शिकायला मिळाले. शाळा सिद्धी कार्यक्रमातून  आम्हीही  "समृद्ध" होत आहोत.

असेसर
   1) समाधान शिकेतोड
   2) रमेश माने

                                        शब्दांकन
                                 समाधान  शिकेतोड
                                'असेसर' शाळा सिद्धी