Wednesday 10 August 2016

सहविचार सभा

● सहविचार सभा ●

                 दिनांक - 7 जुलै 2016

मराठी भाषा व महाराष्ट्राची संस्कृति यांचे संरक्षण ,संवर्धन व संगोपन व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना 1992 साली केली.

      *मा. मुख्यमंत्री या संस्थेचे पद्धसिद्ध अध्यक्ष असून मा. शालेय शिक्षण मंत्री पद्धसिद्ध उपाध्यक्ष आहेत.*

  *मराठीचा विकास - महाराष्ट्राचा विकास* हे बोधवाक्य संस्थेचे आहे. यानुसार संस्था मराठी भाषेच्या समृद्धिसाठी, अभिवृद्धिसाठी अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम, प्रकल्प महाराष्ट्रभर  राबवते.

महाराष्ट्रातील मराठी भाषेचे जाणकार ,तज्ञ,मराठी भाषेच्या समृद्धिसाठी रचनात्मक काम करणा-या भाषाप्रेमीची सहविचार सभा *राज्य मराठी विकास संस्थेने* पुणे येथे आयोजित केली होती.

या सभेत मला माझे विचार, कल्पना, भाषिक उपक्रम मांडण्याची संधी मिळाली. भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्थेतील अधिका-यांसोबत संवाद साधला.

📌 मार्गदर्शक
   ● मा. अपर्णा गावडे
(उपसचिव मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन )
● मा. आनंद काटीकर
( संचालक, राज्य मराठी विकास संस्था )
● मा. विनय मावळणकर
( मा.मंत्री भाषा विभाग यांचे विशेष कार्याधिकारी )
● मा. रेणू दांडेकर  (शिक्षण तज्ञ )
● मा. वर्षा सहस्त्रबुद्धे 
(शिक्षण तज्ञ )
या मान्यवरांनी सहविचार सभेतील उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  ☆मा. वर्षा सहस्त्रबुद्धे☆
समाजातला प्रत्येकजण भाषाशिक्षक असतो. संपूर्ण समाजच भाषाशिक्षक असतो.
अंकुरणारी साक्षरता -
ख-याखु-या संदर्भाने भाषेचा वापर होतो. अवतीभवतीची माणसं लिहताना, वाचताना दिसली तर मुलं सक्ती न करताही लिहतील,वाचतील.
  "मुलांची भाषा आणि शिक्षण" या कृष्णकुमार यांच्या पुस्तकातील सुंदर उदाहरणे दिली. त्यांनी या पुस्तकाचा स्वतः अनुवाद केला आहे.
  
   ☆मा . रेणू दांडेकर ☆
पाठ्यपुस्तक, बोलीभाषा, भाषिक उपक्रम याविषयी चर्चा केली.
मुलांच्या भाषिक समृद्धिसाठी *"अनुभव मंडल"*सारखे उपक्रम राबविण्यात यावेत. मुलांना व्यक्त होण्यासाठी,सृजनशील विचार करण्याची संधी द्यावी.

📌 *भाषा आॅलंपियाड* मध्ये आपल्या देशाला कास्य पदक मिळवून देणार्‍या बारावीत शिकणाऱ्या *अलोक साठे* याने ऑलंपियाडचा प्रेरणादायी प्रवास सांगीतला. महाराष्ट्रातील मुलांनी ही परीक्षा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी द्यावी ही अपेक्षा व्यक्त केली.
आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येत असल्याचे सांगितले.
📌 मा.आनंद काटीकर संचालक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. विविध उपक्रमांची माहिती दिली.

📌 राज्याच्या कानाकोप-यातुन आलेल्या सर्व भाषा प्रेमीनी विविध उपक्रमावर चर्चा केली.

राज्य मराठी संस्थेच्या अधिक माहितीसाठी
https://rmvs.maharashtra.gov.in

या सहविचार सभेला उपस्थित राहून खुप काही शिकायला मिळाले. समृद्ध होता आले.

                            समाधान शिकेतोड

No comments:

Post a Comment