Friday 18 August 2017

चला ग्लोबल होऊया

चला ग्लोबल होऊया ......
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
       स्थळ- रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई         दिनांक - 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2017

    राज्य अभ्यास मंडळ सदस्यांची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई येथे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला सर्व भाषा विषयाचे अभ्यासमंडळ सदस्य उपस्थित होते. बालभारतीचे विशेषाधिकारी, विद्याप्राधिकरणातील संबंधित विभागाचे विभागप्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेची थिम होती " चला ग्लोबल होऊया. . . . "

📌 या कार्यशाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी, सिंधी, कन्नड, तेलगू, संस्कृत, उर्दू इत्यादी भाषा विषयाचे अभ्यासमंडळ सदस्य सहभागी झाले होते. प्रत्येकजण आपापल्या पाठ्यपुस्तकातील उल्लेखनीय बाबी, पाठ्यपुस्तकाची सामर्थ्यस्थळे शेअर करत होते. युगानुकुल विद्यार्थी घडावा यासाठी ही पाठ्यपुस्तके खुपच छान बनलेली आहेत. देशभर महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकाचे कौतुक केले जात आहे.

📌 मा. प्राची साठे मॅडम, विशेष कार्य अधिकारी मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी खुप महत्वाचे, प्रेरणादायी मार्गदर्शन आम्हाला केले.
Learning indicators
Learning Compitancy
Learning Outcomes
Pedagogical strategy
करीकुलमबेस अप्रोच
अंगणवाड्यासाठी आलेला नविन "आकार"अभ्यासक्रम, पुर्वप्राथमिक शिक्षण
   पहिलीचे पाठ्यपुस्तक व भाषाशिक्षण
यावर मॅडमनीं खुप सखोल व अभ्यासपूर्ण विवेचन केले. विविध उदाहरणे दिली.
पाठ्यपुस्तकातील क्षमताविधाने व अध्ययन निष्पत्ती यावर चर्चा केली . अभ्यासमंडळ सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी मॅडमनीं प्रचंड मेहनत घेतली आहे. आम्हाला नेहमीच खुप महत्वाचे मार्गदर्शन करत असतात.

📌मा. माधुरी वाडेकर कार्यक्रम अधिकारी, मा. इरफान इनामदार, अभ्यासक्रम विकसन अधिकारी यांनी Learning Outcomes चे सादरीकरण केले. मा. प्रकाश जावडेकर साहेब,मानव संसाधन विकास मंत्री, भारत सरकार यांचा Learning Outcomes वरील व्हिडिओ प्रेरणादायी होता. त्यांनी  Learning Outcomes चे महत्व सांगुन  प्रत्येक वर्गात Learning Outcomes चे पोस्टर लावावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

📌 पेडाॅगाॅजीकल स्टॅटेजी बदलण्यासाठी अध्ययन निष्पत्ती किती महत्वाच्या आहेत यावर चर्चा झाली.

📌 Learning Compitancy
Maharastra & the world
या सेंशनमध्ये सिद्धेश सर व प्रतीक सर यांनी *सिंगापूर, फिनलंड,कॅनडा* या देशातील Learning Outcomes चा अभ्यास आमच्याकडून करून घेतला. हा नवीनच पण खुप समृद्ध अनुभव आम्हाला मिळाला. आमचा ग्लोबल अप्रोच तयार होण्यास मदत झाली.
  📌  युनिस्कोने ठरवलेल्या उत्तम पाठ्यपुस्तकाची तत्वे व महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकाची यासंदर्भात स्थिती यावरही अभ्यास केला. तर सर्व तत्वे आमची पाठ्यपुस्तके पुर्ण करत असल्याबाबत आम्हाला अभिमान वाटला.

📌 मा.नंदकुमार साहेब,प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मा.डॉ.सुनिल मगरसाहेब, संचालक विद्या प्राधिकरण पुणे.यांनी शेवटच्या दिवशी कार्यशाळेला भेट दिली.
मा.संचालक साहेबांनी सर्व अभ्यासमंडळ सदस्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

📌   ■ मा.नंदकुमार साहेब ■

  ●  जगात जे बेस्ट आहे ते आमच्या मुलांना मिळायला हवे.
  ● तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेबद्दल       माहिती सांगितली.
● 100 % मुले शिकतील अशी पाठ्यपुस्तके तयार करा. असे आवाहन केले. सर्व अभ्यासमंडळ सदस्यांचे कौतुक केले.
●  अध्यापन शास्त्रातील मूर्ताकडून अमूर्ताकडे इत्यादी सुत्रे जीवनव्यवहारातील उदाहरणासह समजून सांगितली.
● पूर्वप्राथमिक शिक्षण झालेले असो की नको आई -बाबा बोलके असो की नसो प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे.

आदरणीय नंदकुमार साहेबांच्या प्रेरणादायी व उर्जस्वल मार्गदर्शनामुळे अभ्यासमंडळ सदस्यांमध्ये नवचैतन्य फुलले होते.
या तीन दिवसांच्या कार्यशाळेत समृद्ध असे अनुभव मिळाले.

समाधान शिकेतोड
सदस्य, राज्य अभ्यास मंडळ पुणे.
विषय सहायक, DIECPD, उस्मानाबाद.

No comments:

Post a Comment