Monday 25 September 2017

बोलीभाषा कार्यशाळा अमरावती

●बोलीभाषा कार्यशाळा●
स्थळ-विभागीय क्रिडा संकुल, अमरावती.
दिनांक- 21 व 22 सप्टेंबर 2017.

विद्याप्राधिकरण पुणे यांनी आदिवासी बोली 
असणा-या जिल्ह्याची बोलीभाषा कार्यशाळा अमरावती येथे आयोजित केली होती. पालघर, नाशिक, नंदूरबार, चंद्रपूर,गोंदिया, अकोला, धुळे, ठाणे, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यातील मा.प्राचार्य, मा.अधिव्याख्याता, विषय सहायक,बोलीभाषेवर रचनात्मक काम केलेले उपक्रमशील शिक्षक,बोलीभाषेवर काम केलेले स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कार्यशाळेसाठी सहभागी झालेले होते.
📌 उपक्रमशील शिक्षकांनी आपआपल्या शाळेत केलेल्या रचनात्मक कामाचे सादरीकरण केले. वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगळं वेगळं रचनात्मक काम पाहायला मिळाले. कोरकु,कातकरी, पावरा, वारली, माडीया गोंड,मावची,पावरी इत्यादी आदिवासी बोलीभाषेवरील काम पाहायला मिळाले. अशा शाळेत अनेक समस्या असतात. दुर्गम भाग, भौतिक सुविधांचा अभाव अशा प्रतिकुल परिस्थितीत खुप उत्तम काम केल्याचे पाहायला मिळाले.
📌  मी नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील  बहुभाषिक वर्गातील मुलांसाठी केलेल्या रचनात्मक कामाचे अनुभव कथन केले. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील बंजारा व पारधी बोलीभाषेवर तसेच बहुभाषिक शाळांच्या समस्येवर काम सुरू केले आहे. यासाठी पुढील कामाची दिशा मिळाली.
📌   उपक्रमशील शिक्षकांनी आदिवासी  बोलीभाषेतील शब्दकोश, पुरक वाचन साहित्य तयार केलेले होते.ते पाहायला मिळाले.
📌 उन्नती या स्वयंसेवी संस्थेने कोरकु बोलीभाषेवर केलेल्या रचनात्मक कामाचे अनुभव मा.हेमांगी जोशी यांनी  सर्वांना सांगीतले.

📌 भिन्न भिन्न बोलीभाषा असणा-या मुलांसाठी कोणते वाचन साहित्य असावे.
शिक्षक सक्षमीकरण कसे करता येईल.
बोलीभाषा असणा-या मुलांच्या शिकण्यातील अडचणी कोणत्या आहेत.

📌 भिन्न भिन्न बोलीभाषा असणारी मुले वाचायला कशी शिकतील?त्यासाठी कोणकोणते साहित्य तयार करावे लागेल?

बोलीभाषेतील शिक्षकांचा दृष्टीकोन कसा असावा?तो वाढविण्यासाठी काय उपाययोजना करावी?

बोलीभाषेसाठी पर्यवेक्षिय यंत्रणेची भूमिका काय?ती सुयोग्य रितीने पार पाडावी यासाठी काय उपाययोजना असावी?
अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

प्रादेशिक विद्याप्राधिकरण, अमरावती यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले.

मा.सुजाता लोहकरे,मा.नामदेव माळी,मा.प्रतिभा भराडे, मा.ललिता भामरे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
मा. सचिन लोखंडे, मा.हनुमंत जाधव, मा. संदिप वाकचौरे ह्या  विद्याप्राधिकरणाच्या मराठी विभागाच्या टिमने कार्यशाळेचे संचलन केले. मा.सुजाता लोहकरे,मराठी विभाग प्रमुख  विद्याप्राधिकरण पुणे व त्यांची टिम  या आदिवासी बोलीभाषा असणा-या विविध जिल्ह्यातील शाळांचा नुकताच अभ्यासदौरा करून आली होती. तेही अनुभव त्यांनी शेअर केले.

या कार्यशाळेसाठी सहभागी झाल्यामुळे मला खुप नवीन शिकता आले. माझ्या जिल्ह्यात काम करण्यासाठी दिशा मिळाली.

         समाधान शिकेतोड
            विषय सहायक
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.

No comments:

Post a Comment