Wednesday 21 November 2018

🌈 आरंभिक साक्षरता राज्यस्तरीय परिसंवाद🌈

🌈 आरंभिक साक्षरता राज्यस्तरीय परिसंवाद🌈
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
       स्थळ-पेस हाॅस्पिटॅलिटी ट्रेनिंग सेंटर औरंगाबाद
दिनांक-16-19 नोव्हेंबर 2018

आरंभिक साक्षरता या विषयावर क्वेस्ट व रिड अलायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय परिसंवाद औरंगाबाद येथे  संपन्न झाला. या परिसंवादात वक्ते म्हणून आरंभिक साक्षरता या विषयाच्या देशभरातील तज्ञांनी संवाद साधला.या परिसंवादात शिक्षण विभागतील प्रयोगशील अधिकारी,शिक्षक प्रशिक्षक,प्रयोगशील शिक्षक सहभागी झाले होते.

📌  या परिसंवादात अंकुरती साक्षरता,वाचन,मुलांच्या साक्षर होण्यात बालसाहित्याचे महत्त्व,स्तराधारित शिक्षण कार्यक्रम(LBL),साक्षरतेच्या मूल्यमापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर,भाषेचे सांस्कृतिक राजकारण,नाटकाच्या माध्यमातून बालसाहित्याचे सादरीकरण तसेच विविध संस्थांनी साक्षरतेच्या संदर्भात केलेल्या रचनात्मक कामाचे सादरीकरण केले.
📌 परिसंवादात सर्वांना एकमेकांचे विचार व रचनात्मक काम समजून घेण्याची संधी मिळाली. या विषयाची शास्त्रीय वैचारीक बैठक निर्माण होण्यास मदत झाली.
📌 औरंगाबाद जि.प च्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिसंवादाला पहिल्या दिवशी भेट दिली व सर्वांशी संवाद साधला.
📌 देशातील विविध राज्यात सुरू असलेल्या "आरंभिक साक्षरतेच्या" प्रयोगाविषयी,प्रकल्पाविषयी माहिती मिळाली.
📌  *बालसाहित्य* या विषयावचे अनेक पदर उलगडले.बालसाहित्याचे साक्षरतेच्या विकासातील महत्त्व,मुलांसाठी योग्य साहित्य निवड करण्यासाठीचे निकष कोणते असावेत? याबद्दल खुपच महत्त्वाची व उपयुक्त माहिती मिळाली.
📌 फलटण येथिल प्रगत शिक्षण संस्थेच्या भाषा शिक्षणाच्या कामाचे सादरीकरण मस्तचं होते.डाॅ. मॅक्सीन बर्नसन यांनी 1984 साली स्थापन केलेल्या संस्थेत वंचित घटकातील मुलांना वाचन-लेखन शिकवण्याच्या खास पद्धतीविषयी माहिती मिळाली.
📌 बहुभाषिक वर्गातील मुलांसाठी केलेल्या रचनात्मक कामाचे अनुभव कथन करताना प्रयोगशील शिक्षक प्रल्हाद काठोले यांनी केले.हे सगळं समजून घेताना नवनवीन संकल्पना समजत गेल्या.

📌 मुलांसोबत काम केलेल्या प्रयोगशील शिक्षकांचे काम समजून घेता आलं.या क्षेत्रातील विविध संशोधने याबद्दल चर्चा झाली.

या परिसंवाद मिळालेल्या समृद्ध अनुभवाचा उपयोग प्रत्येक मुलं शिकण्यासाठी व शिक्षक सक्षमीकरणासाठी नक्कीच होईल. असा विश्वास वाटतो.

या परिसंवादाचं अगदी नेटकं नियोजन शिक्षणतज्ञ आदरणीय निलेश निमकर सर व त्यांच्या टिमनं केलं होत.हा अनुभव खुपच समृद्ध करून गेला.

समाधान शिकेतोड

No comments:

Post a Comment