Monday, 2 September 2019

जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साधला पाच हजार शिक्षकांशी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून संवाद

शिक्षण परिषद दि.२९/८/२०१९

जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम व निती आयोगाअंतर्गत सर्वच स्तरावर कार्यप्रेरीत होऊन 100% मुले शिकण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.मुलभूत क्षमता,अध्ययन निष्पत्ती प्रत्येक मुलांना प्राप्त व्हाव्यात यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे.या अनुषंगाने शिक्षकांचे सक्षमीकरण व्हावे,यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये "अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव व प्रश्न निर्मिती कौशल्य"या विषयावर जिल्ह्यातील सर्व केंद्रामध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षकांची केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.या शिक्षण परिषदेला झुम मिटींगद्वारे मा.दिपा मुधोळ-मुंडे जिल्हाधिकारी,उस्मानाबाद, मा.डॉ.संजय कोलते,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.उस्मानाबाद व मा.डॉ. आय.पी.नदाफ प्राचार्य,DIECPD उस्मानाबाद यांनी जिल्ह्यातील 80 केंद्रातील सुमारे 5000 शिक्षकांशी प्रेरणादायी संवाद साधला.यावेळी सविता भोसले, शिक्षणाधिकारी (प्रा.) व गजानन सुसर शिक्षणाधिकारी (मा.),मा.वरिष्ठ अधिव्याख्याता,मा.अधिव्याख्याता,मा,उपशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
 मा.जिल्हाधिकारी यांनी अध्ययन निष्पत्तीवर मुलांसोबत काम करावे.NAS च्या चाचणीचे विश्लेषण करून मुलांच्या स्तरानुसार अध्ययन अनुभव द्यावेत.अध्ययन अनुभव देताना ग्रंथालय,प्रयोगशाळा,शैक्षणिक साहित्याचा वापर करावा.असे आवाहन केले. शाळामध्ये Happy hour असायला हवा.यामध्ये मुलांच्या मेंदूला चालना देणारे विविध खेळ घ्यायला हवेत.आपण नेहमी विद्यार्थी असतो. नवनवीन बाबी शिकायला हव्यात. स्वतःला समृद्ध करायला हवं.अध्ययन निष्पत्ती वर एकात्मिक पद्धतीने काम करायला हवं.विविध अध्ययन स्त्रोत शाळेत उपलब्ध आहेत. पण त्याचा कल्पकतेने वापर करायला हवा.असे प्रेरणादायी व उर्जस्वल मार्गदर्शन मा.जिल्हाधिकारी यांनी केले.
 मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भाषा,गणित,इंग्रजी या अध्ययन समृद्धी साहित्य पेटीतील साहित्याचा वापर करून मुलांना कृतीयुक्त अध्ययन अनुभव दिले जावेत.त्यामुळे मुलांच्या क्षमता विकसीत होतील.NAS चाचणीतील मुलांची संपादणूक पातळी वाढण्यासाठी अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव द्यावेत.शाळांनी निती आयोगातील सर्व दर्शकांची पुर्तता करायला हवी. शाळा तेथे ग्रंथालय असावे.ग्रंथालयाचा वापर अध्ययन निष्पत्ती विकसीत करण्यासाठी करावा.ग्रंथालय पुस्तकांनी समृद्ध असावे.असे प्रेरणादायी व उर्जस्वल मार्गदर्शन केले.
 सर्व तालुक्यातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे सनियंत्रण गटशिक्षणाधिकारी यांनी केले.केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये विस्तार अधिकारी(शिक्षण), केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती,CRG सदस्य यांनी सुलभक म्हणून काम केले.DIECPD ने दिलेल्या विविध विषयांच्या PPT व नियोजन याप्रमाणे जिल्ह्यात शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. IT विभाग DIECPD यांनी झूम मिटींगचे उत्तम नियोजन केले होते.जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी झूम मिटिंग साठी मदत केली. अध्ययन निष्पत्ती नुसार एका आशयावर अध्ययन पातळ्यानुसार दर्शक तयार करणे,अध्ययन अनुभवाची निवड करणे.अध्ययन पातळ्यानुसार प्रश्ननिर्मिती करणे.याचा अनुभव शिक्षकांनी घेतला. शिक्षण परिषदेत सुलभकांनी भाषा,गणित,इंग्रजी,विज्ञान,सा.शास्त्र या विषयांचे सादरीकरण केले.शिक्षकांनी प्रात्यक्षिकासह सर्व विषय समजून घेतले. अध्ययन पातळ्यानुसार शिक्षकांनी आशयावर प्रश्न निर्मिती केली.शिक्षण परिषदेतील अनुभव निश्चितच वर्गांतरक्रियेत उपयोगी पडेल.असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
DIECPD,उस्मानाबाद मधील अधिकारी मा.वरिष्ठ अधिव्याख्याता,मा.अधिव्याख्याता,विषय सहायक,समुपदेशक,जिल्हा समन्वयक,विषय तज्ञ,विशेष शिक्षक व शिक्षण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद मधील अधिकारी यांनी शिक्षण परिषदेला भेटी दिल्या. अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात जिल्ह्यातील शिक्षण परिषद संपन्न झाली.

No comments:

Post a Comment