Sunday 3 November 2019

राष्ट्रीय स्तर एज्युकेशन इनोव्हेशन कॉन्फरन्स 2019 सोलापूर

 राष्ट्रीय स्तर एज्युकेशन इनोव्हेशन कॉन्फरन्स 2019 सोलापूर
------------------------------------------------------------------------
स्थळ:- सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर.
दिनांक:- 31ऑक्टो.व 1नोव्हें. 2019
आयोजक:- SIR फाउंडेशन सोलापूर
            DIECPD, वेळापूर,सोलापूर.
राज्यातील उपक्रमशील शिक्षकांची "राष्ट्रीय स्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स" सोलापूर या ठिकाणी संपन्न झाली.या कॉन्फरन्समध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ,शिक्षण तज्ञ, शिक्षण विभागातील अधिकारी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात व देशभरात मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी रचनात्मक काम करणाऱ्या एनजीओचे सादरीकरण पाहायला मिळाले.दोन दिवस खूप काही नवीन शिकायला,समजून घ्यायला मिळाले राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांचे उपक्रम समजून घेता आले.
मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी, सर्वांगीण विकासासाठी प्रयोगशील शिक्षक आपापल्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत.या या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण या कॉन्फरन्समध्ये झाले.काही शिक्षकांनी 'शोधनिबंध' ही  सादर केले."SIR"फाउंडेशनने आयोजित केलेल्या नवोपक्रम स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
जागतिक किर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ
मा.अरविंद नातू यांनी वर्तमानकालीन शिक्षण व्यवस्थेबद्दल परखड भाष्य केले.मुलांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागायला हवी.जगभरामध्ये शालेय वयापासूनच संशोधनाला प्राधान्य दिले जाते.निसर्गाचं,आजूबाजूच्या
भोवतालचं बारकाईने मुलांना निरीक्षण करायला शिकवा.या निरीक्षणातून मुलाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतील.त्यामुळे त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लागेल.त्यांनी "आयसर" या संस्थेविषयी माहिती सांगितली.आपल्या ओघवत्या शैलीत आपल्या रसाळवाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
"शिक्षणातील नवे प्रवाह" या विषयावर उपक्रमशील शिक्षकांचा परिसंवाद संपन्न झाला. मा.श्री.विपुल शहा,मुख्य शास्त्रज्ञ टीसीएस पुणे यांचे "कॉम्पिटिशन थिंकिंग" या विषयावरचे व्याख्यान मला खूप आवडले.TCS पाठशाळा
(https://cspathshala.org/)  याच्या आधारे मुलांमध्ये चिकित्सक विचार,तर्क,अनुमान ही कौशल्य विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून मुलांची "कॉम्पिटिशनल थिंकींग" कशा पद्धतीने विकसित करता येईल. याबद्दलचे सादरीकरण त्यांनी केले.
मा.श्री.विवेक सावंत,कार्यकारी संचालक एमकेसीएल मुंबई यांनी "स्मार्ट स्कूल" या विषयाचे सादरीकरण केले.तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी कसे नाविन्यपूर्ण काम करता येईल.याबद्दल नवीन संकल्पना शिक्षकांपर्यंत पोहोचवल्या.
मा.डॉ.शकुंतला काळे,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे,मा.डॉ.शोभा खंदारे,उपसंचालक,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे,मा.सुमन शिंदे,माजी शिक्षण उपसंचालक,मा.डॉ.कमलादेवी आवटे,प्राचार्य,DIECPD पुणे, मा.ज्योती मेटे, प्राचार्य,DIECPD, सोलापूर,मा.बलभीम चौरे, प्राचार्य DIECPD,लातूर,मा.आय.पी. नदाफ,DIECPD, उस्मानाबाद,मा.संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी(प्रा.)सोलापूर,
मा.डॉ.गीतांजली बोरुडे संशोधन विभाग,प्रिसीजन फांऊडेशनच्या अध्यक्षा मा.सुहासिनी शहा यांनी शिक्षकांशी संवाद साधला.प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी SCERT मधील अधिकारी मा.डॉ.प्रभाकर क्षिरसागर,समता विभाग,डॉ.दत्तात्रय मेंढेकर, अभ्यासक्रम विकसन विभाग,मा. कादर शेख प्रशासन अधिकारी सोलापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राज्यातील मा.वरिष्ठ अधिव्याख्याता,मा. अधिव्याख्याता,मा.गटशिक्षणाधिकारी,
मा.प्रशासनाधिकारी,मा.शिक्षण  विस्तार अधिकारी,विषय सहायक, साधनव्यक्ती या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेले होते.
श्री.संतोष सोनवणे विषय सहायक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी गणित समजून घेताना या विषयावरचे खूप अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.
मान्यवरांच्या हस्ते अनेक शिक्षकांच्या पुस्तकांचे प्रकाशनही या कॉन्फरन्समध्ये झाले.
या दोन दिवसात अनेक उपक्रमशील शिक्षक मित्र व प्रयोगशील अधिकारी त्यांच्याशी संवाद साधता आला.खूप नवीन शिकता आलं,समृद्ध होता आलं. आमचे मित्र श्री.सिद्धराम माशाळे,श्री.बाळासाहेब वाघ,श्रीमती.हेमा शिंदे श्री.राजकिरण चव्हाण व त्यांची सर्व टीम यांनी या कॉन्फरन्सचे खूप सुंदर नियोजन केले होते.
समाधान शिकेतोड
DIECPD,उस्मानाबाद
samadhanvs@gmail.com

1 comment: