चला वाचूया
किशोर
दिनांक: १८ मार्च २०२१
किशोर
मासीकासंदर्भातील वर्तमानपत्रांतील बातमी वाचून काल जि.प.प्रा.शाळा जरेवाडी शाळेचे
(ता.पाटोदा जि.बीड) मुख्याध्यापक श्री.संदीप पवार यांचा फोन आला.श्री.संदीप पवार
हे प्रयोगशील मुख्याध्यापक असुन त्यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
मिळालेला आहे.मुलांच्या शिकण्यासाठी ते सातत्याने नवनवीन उपक्रम,प्रकल्प राबवत असतात.
त्यांच्या शाळेचा
पट आहे ७५० आहे. या शाळेत गावातील फक्त ५०
विद्यार्थी आहेत. आसपासच्या गावातून इतर
विद्यार्थी येतात. जि.प.प्रा.शाळा जरेवाडी ही राज्यातील प्रयोगशील शाळा आहे.
या शाळेचे मुख्याध्यापक श्री.संदीप
पवार यांनी शाळेतील जवळपास ५०० विद्यार्थ्यांना
किशोर मासीकाचे वर्गणीदार करण्याचा मनोदय व्यक्त केला. वाचन चळवळीला गतीमान
करण्यासाठी,शालेय वयात मुलांवर
वाचनाचे संस्कार करण्यासाठी किशोर हे दर्जेदार मासिक आहे.यासाठी ते मुलांची स्वतः वर्गणी
भरत आहेत.
No comments:
Post a Comment