Thursday, 30 July 2026

प्रयोगशील शिक्षकांचे गावकऱ्यांकडून कौतुक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत प्रयोगशील कार्य केलेल्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रुक्मिणी बारकुल या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. तसेच या शाळेतील प्रयोगशील शिक्षक श्री. योगेश कपाळे यांची बदली झाल्यामुळे त्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप देण्यात येत आहे. या दोघांच्याही सत्काराचा कार्यक्रम  उद्या शाळेत संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने......

श्रीमती रुक्मिणी बारकुल व श्री. योगेश कपाळे यांनी पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत उत्कृष्ट कार्य केले. मुलांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत सहशालेय उपक्रमांच्या आयोजन केले. शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ व्हावी, शाळा समृद्ध व्हावी यासाठी लोकसहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न केला. 

श्रीमती रुक्मिणी बारकुल व श्री. योगेश कपाळे यांनी समर्पित वृत्तीने शाळेच्या विकासासाठी सदैव पुढाकार घेतला. श्रीमती रुक्मिणी बारकुल यांनी समाजशास्त्र या विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांना सर्जनशील अध्ययन अनुभव दिले. त्यांनी सदैव विद्यार्थ्यांच्या हिताचा ध्यास घेतला होता.

श्री. योगेश कपाळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे प्रयोगशील शिक्षक आहेत. त्यांचे शाळेच्या विकासात खूप मोठे योगदान आहे. शाळेसाठी समर्पित वतीने काम करत त्यांनी मुलांना घडविण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प, उपक्रम राबविले. सहशालेय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, कला क्रीडा विषयातील विविध उपक्रम त्यांनी शाळेत राबविले. श्री. योगेश कपाळे हे तंत्रस्नेही शिक्षक असून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिले. शाळा भौतिक सुविधांनी समृद्ध करण्यासाठी पालकांना प्रेरित केले. श्री.योगेश कपाळे हे एक उपक्रमशील शिक्षक, व चांगले मित्र म्हणून मला माझ्या सदैव स्मरणात राहतील. या दोघांनाही त्यांच्या पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा.

No comments:

Post a Comment