Thursday, 23 July 2026

जवाहर बालभवन येथे शिक्षण संवाद कार्यशाळा संपन्न

शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून जवाहर बालभवन, मुंबई येथे शिक्षण संवाद ही कार्यशाळा २२ जुलै रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेला मा.आयुक्त (शिक्षण), मा.शिक्षण संचालक, शालेय शिक्षण विभागातील अधिकारी,शिक्षण अभ्यासक, शिक्षणतज्ञ, प्रयोगशील शिक्षक, कला, क्रीडा विषयातील तज्ञ व्यक्ती उपस्थित होते. या कार्यशाळेला आदरणीय मंत्रिमहोदयांनी प्रेरणादायी व उर्जस्वल मार्गदर्शन केले.

अध्ययन अध्यापनातील प्रयोग आणि गुणवत्ता संवर्धन, शालेय स्तरावर कला, क्रीडा, अभिनव उपक्रम, शालेय स्तरावर सैनिकी शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध विषयांवर विचार मंथन झाले. जागतिक कीर्तीचे प्रयोगशील शिक्षक आदरणीय दत्ता वारे सरांनी शाळा विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्दे मांडले. स्वयंप्रेरित शिक्षक, शिक्षण पद्धती, शालेय परिसर, शालेय संस्कृती या बाबी शाळा विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. कला,क्रीडा, साहित्य, संरक्षण या क्षेत्रातील मान्यवरांना ऐकता आले. राज्यातील प्रयोगशील अधिकारी व शिक्षक यांच्या भेटी झाल्या. एकमेकांचे रचनात्मक कार्य समजून घेता आले. शालेय शिक्षण विभागाने कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन केलेले होते.


No comments:

Post a Comment