Monday, 3 August 2026

राघुचीवाडी शाळेत रंगला कौतुक सोहळा

३१ जुलै रोजी आमच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका आदरणीय श्रीमती रुक्मिणी बारकुल यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आमच्या शाळेतील प्रयोगशील शिक्षक आमचे मित्र योगेश कपाळे यांची शाळेतून बदली झाल्यामुळे त्यांचा सत्कार करून कृतज्ञतापूर्वक निरोप देण्यात आला. 

श्रीमती रुक्मिणी बारकुल यांनी शाळेला रंगीत प्रिंटर भेट दिला. तर श्री. योगेश कपाळे यांनी शाळेला पाण्याचे जार भेट दिले. दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी समर्पित भावनेने कार्य केले. शाळेच्या विकासात त्या दोघांच्याही खूप मोठे योगदान आहे. 

#डायरी_राघुचीवाडी #शिक्षण #निरोप #जिल्हा_परिषद_शाळा

No comments:

Post a Comment