आदरणीय नीलेश निमकर सर यांच्या शिकता शिकविता या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा ३ नोव्हेंबर रोजी पुण्यात संपन्न झाला. मला या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक, प्रसिद्ध चरित्रलेखिका वीणा गवाणकर, प्रसिद्ध सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांना ऐकता आले.
अतुल कुलकर्णी हे आपल्याला सिनेअभिनेते म्हणून परिचित आहेतच.त्याचबरोबर त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद आहे. क्वेस्ट संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करत आहेत.त्यांनाही प्रत्यक्ष ऐकता आलं. त्यांचे शिक्षणविषयक विचार समजून घेता आहे.त्यांनी निमकर सरांच्या पुस्तकावर खूपच छान भाष्य केले.
No comments:
Post a Comment