Thursday, 21 May 2015

★ ATF शिक्षण संमेलन 2015★

★ ATF  शिक्षण संमेलन 2015★
अॅक्टीव टिचर फोरम चे शिक्षण संमेलन बायफ पुणे येथे 18 व 19 मे रोजी संपन्न झाले.सकारात्मक उर्जा घेऊन काम करणारे प्रयोगशील शिक्षक,शिक्षणतज्ञ, प्रयोगशील अधिकारी संमेलनासाठी आले होते. ATF चे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी छान प्रास्ताविक केले.
शिक्षणतज्ञ के.के.कृष्णकुमार यांनी "गुणवत्तापुर्ण शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात शिक्षकाची भूमीका" या विषयावर विचार मांडले.सर्वानी त्यांच्यासोबत मनमोकळेपणानं चर्चा केली.भारतातील विविध शैक्षणिक प्रवाहाबद्दल सखोल विवेचन केलं.नंतर दृष्टीकोनात बदल हा परिसंवाद रंगला.
         प्रतिभा भराडे,मंजिरी निंबकर,मोहन भोईर,प्रल्हाद काठोले,नामदेव माळी,मोहन देस यांनी परिसंवादात भाग घेतला.नामदेव माळी सरांनी विनोदी शैलीनं व्यवस्थेतील उणीवा सांगीतल्या. व्यवस्थेतील सर्वानीच मुलांशी संवाद साधायला हवा.पदाचा हँगओव्हर होऊ नये. जी तारे,बेटं काम करतात त्यांना व्यवस्थेतेन बळ द्याव.
         प्रयोगशील शिक्षकांनी लावलेल्या पोस्टरचं वेगळच आकर्षण होतं. शाळेत राबवलेले प्रयोग,उपक्रम यावर पाहायला मिळत होते.राम,सोमनाथ,गुणेश,अनिल,फारूख,अगस्ती हे सर्वजण हाॅलमधील व्यवस्थेची काळजी घेत होते.
इंग्रजी व सेमी इंग्रजी यावर परिसंवाद झाला.वर्षा सहस्त्रबुद्धे,श्रीधर लोणी,जे.के.पाटील,फारूख काझी,कृतीका बुरघाटे, के.के.कृष्णकुमार यांनी सविस्तर चर्चा केली.मुलांचं शिक्षण प्राथमिक भाषेतुन व्हावं हाच मुख्य चर्चेचा सुर होता.शुभदा चौकर यांनी संचलन केले.
अशातच  प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग आदरणीय नंदकुमार साहेब आले.वातावरण प्रफुल्लीत झालं.साहेबांनी सर्वांसोबत छान चर्चा केली.
अचानक मस्तानी आल्याचा आनंद सर्वाना झाला.मस्तानीचा आस्वाद घेतल्यानंतर साहेबांनी पुन्हा सर्वाशी चर्चा केली.
शेवटी गाणी गप्पांचा छान कार्यक्रम रंगला......

संमेलनाच्या दुस-या दिवशी तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर यावर परसंवाद रंगला.विवेक सांवत,अनिल सोनुने,नीलेश निमकर,राम सालगुडे यांनी यात सहभाग घेतला.सांवत सरांनी खुप छान मार्गदर्शन केले.सर्वानी खुप छान चर्चा केली.सोमनाथ सरांनी संचलन केले.
यानंतर बालकांचे आणि व्यवस्थेचे मूल्यमापन या परिसंवादात वैशाली गेडाम,विवेक माॅटेरो यांनी सहभाग घेतला.वैशाली गेडाम यांनी त्या करत असलेल्या प्रयोगाविषयी सांगीतले.राहुल गवारे यांनी यांच संचलन केलं.
     संमेलनातला हा परिसंवाद खुपच झकास रंगला.शिक्षक म्हणून आपल्या समृद्धीसाठी या विषयावरप्रमोद धायगुडे,गुणेश डोईफोडे,सुरेश सुतार,कल्पना बनसोड,शशीकला पाटील,मोहन भोईर,सुवर्णा देशपांडे,योगेश थोरात या शिक्षकांनी विचार मांडले. प्रमोद धायगुडे,कल्पना बनसोड यांनी तर संपूर्ण सभागृहाला जिंकल.खुपच छान समृद्धीचा प्रवास कथन केला.प्रकाश आरोटे यांनी संचलन केले.
गीता महाशब्दे यांनी पुढील गुणवत्ता कार्यक्रमाबद्दल  माहीती दिली.त्यावर चर्चा झाली.
नंतर भाऊ,समिक्षा,हिरालाल सर यांनी ठराव मांडले.सर्व ठराव संमत झाले.
नामदेव माळी यांनी
धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है........
हे गीत सर्वांसोबत गाऊन संमेलनाची
सांगता झाली.

माझं हे पहिलच संमेलन...मला खुप काही शिकायला मिळाल.संवाद साधता आला.या चळवळीतला कार्यकर्ता असल्याचा आनंद मनोमन होत होता.
भाऊचं व त्यांच्या सहका-याच्या कष्टातून उत्कृष्ट नियोजन झाल होत.