आज माझ्या आर्यनला आइस्क्रीमचा कोन खाण्याची इच्छा झाली. आम्ही दोघही आइस्क्रीम आणण्यासाठी गाडीवर निघालो.बालहट्टापुढं पर्याय नव्हता.
बाहेर
ऊन मी म्हणत होत.
40 अंशाच्या पुढ पारा असावा.
गाडीवर जाताना एक दृश्य दिसल.
एक मुलगी या रणरणत्या ऊन्हात गाण्याच्या तालावर कसरती करत होती.एक तिची छोटी बहीण परातीवर छडीनं मारून वाजवत होती.एकजण आॅरगण वाजवत होता तर दुसरा चित्रपटातील गीत गात होता. अशा रणरणत्या ऊन्हात पोटाची खळगी भरण्यसाठी चाललेली ही धडपड पाहून थोडी तिथं गाडी थांबवली....थांबलीच. ही दोन तीन मुलं शाळाबाह्य असावीत. पण जगण्यासाठी ही जीवघेणी कसरत बघताना हे बघणा-याला काय आनंद देत असेल?
माझ्या लेकराला ऊन लागू नये म्हणून डोक्याला मी रूमाल बांधला होता.
पण ती
लेकरं
तर भर ऊन्हात जगण्यासाठीचा संघर्ष करत होती.माझ्या मनाला खुप वेदना झाल्या.
पण पाहण्याशिवाय काय करू शकत होतो. या वंचीताना
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही काय?
त्यांची भूक शमवण्यासाठी आपण
फक्त
भिक देणार आहोत काय?
मग अशा वंचितासाठी समाजाची संवेदनशीलता
नक्कीच जागायला हवी.
त्यासाठी समजून घ्यावी लागेल त्यांची सहवेदना..........
Wednesday, 20 May 2015
भूकेसाठी भिक नको
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment